अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं

On: May 14, 2024 12:28 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis l सध्या देशात निवडणुकीचे वारे जोरात फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता पाचव्या टप्प्याची तयारी दिग्गजांकडून करण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत जनतेने कौल कोणाला दिला आहे हे मात्र 4 जुनलाच समजणार आहे.

आमचं सरकार हे वापरा आणि फेका असं नाही : फडणवीस

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद नेमकं कोणाला मिळणार? एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार की अजित पवारांना संधी मिळणार? याशिवाय राज्याचं नेतृत्त्व भाजपकडे जाणार असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यावर त्यांनी अगदी रंजक उत्तर दिल आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वात लढली जाईल याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचं याचा निर्णय पक्ष करेल. आमचं सरकार हे वापरा आणि फेका असं नाही. आमची महायुती आहे. निवडणूक होईपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील. त्यानंतर पुढील निर्णय पक्ष घेईल असे फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis l मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही :

या राज्यात कोणीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं, स्पप्न पाहणं काही चुकीचं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात भजन करायला किंवा आमची पालखी वाहायला आलेले नाहीत. त्यांच्या मनात देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व महत्त्वाकांक्षा असू शकते हे काही गैर नाही.

इच्छा, आकांक्षा असण्यात काहीही चुकीचं नाही. पण मात्र राजकीय वास्तवही लक्षात घ्यायला हवं आहे. सध्या भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. विधानसभेनंतर देखील हीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे यासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तसेच त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी चर्चा केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

News Title : Will Ajit Pawar Become Cm After Assembly Elections Deputy Cm Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले

‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण

नागरिकांची ‘त्या’ त्रासापासून होणार कायमची सुटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार

आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now