अजित पवार मुख्यमंत्री होणार?, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

On: October 12, 2023 2:38 PM
---Advertisement---

अकोला | अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते अकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

जर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्याबाबत शरद पवारांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना शरद पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. तसेच हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही, असं म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीये. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. आमची नव्हे. भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असंही पवार यावेळी म्हणालेत.

दरम्यान, आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now