सोनम वांगचुक यांच्या जीवाला धोका? पत्नीचे थेट हायकोर्टात गंभीर आरोप

On: July 19, 2026 12:48 PM
Sonam Wangchuk
---Advertisement---

Sonam Wangchuk | दिल्लीतील जंतरमंतर (Jantar Mantar) येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत अधिकृत वैद्यकीय बुलेटिन जारी केले आहे. मात्र, यादरम्यान त्यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो (Gitanjali Angmo) यांनी गंभीर आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून उपचार आणि वैद्यकीय अहवालांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

दुसरीकडे उपचाराची मागणी :

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गीतांजली आंग्मो यांनी सफदरजंग रुग्णालयावरील विश्वास उडाल्याचे नमूद केले आहे. त्यांनी न्यायालयाकडे विनंती करत सोनम वांगचुक यांना तातडीने अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. तसेच उपचाराच्या नावाखाली त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याचिकेनुसार, सोनम वांगचुक हे गेल्या 21 दिवसांपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत होते. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले तेव्हा त्यांच्या वकिलांना तसेच गेल्या 20 दिवसांपासून आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांनाही त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय त्यांची सध्याची स्थानबद्धता ही घटनाबाह्य असून भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 आणि 21 चे उल्लंघन असल्याचे घोषित करावे, तसेच कुटुंबाला योग्य वाटेल त्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

Sonam Wangchuk | रक्त तपासणीच्या अहवालावरून उपस्थित केले प्रश्न :

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गीतांजली आंग्मो यांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना सोनम वांगचुक यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी 2.9 असल्याची माहिती दिली होती आणि ती जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचे सांगितले होते. मात्र, अधिकृत आरोग्य बुलेटिनमध्ये हा आकडा नमूद करण्यात आला नसून केवळ पोटॅशियमची पातळी कमी होत असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे दावा केला की, त्याच रात्री सुमारे 10.30 वाजता स्वतंत्र प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्यात आली. त्या तपासणीच्या अहवालात पोटॅशियमची पातळी 3.5 असल्याचे समोर आले, जी सामान्य श्रेणीत मानली जाते. या दोन वेगवेगळ्या अहवालांतील फरकामुळे वैद्यकीय नोंदी आणि उपचार प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाल्याचे सांगत गीतांजली आंग्मो यांनी सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय अहवालांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

News Title: Wife Moves Court Over Sonam Wangchuk Health

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now