Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा सर्वात विश्वासू स्ट्राइक बॉलर मानला जातो. पण आयपीएल 2026 मध्ये त्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पाच सामने खेळूनही त्याला एकही विकेट मिळालेली नाही, ही त्याच्या करिअरमधील अत्यंत वाईट स्थिती आहे. त्यामुळे चाहते आणि टीम मॅनेजमेंट दोघेही हैराण झाले आहेत.
फलंदाजांचा बदललेला दृष्टिकोन :
या हंगामात बुमराहने पंजाब किंग्स (Pbks), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), राजस्थान रॉयल्स (RR), दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गोलंदाजी केली. त्याचा इकॉनॉमी रेट 8.63 आहे, जो आयपीएलच्या मानाने वाईट नाही. पण बुमराहसारख्या गोलंदाजाकडून फक्त धावा रोखण्यापेक्षा विकेट्सची जास्त अपेक्षा असते.
पूर्वी बुमराहचं नाव ऐकताच फलंदाज बचावात्मक खेळायचे. पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. फलंदाज त्याच्यावर आक्रमक खेळत आहेत आणि मोठे शॉट्स मारण्यास अजिबात घाबरत नाहीत. यामुळे त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम झाला आहे.
Jasprit Bumrah | गोलंदाजीत झालेले तांत्रिक बदल:
या सीजनमध्ये बुमराहच्या गोलंदाजीत मोठा बदल दिसतोय. तो जास्त प्रमाणात स्लोअर चेंडू टाकताना दिसतोय. सुमारे 44% चेंडू स्लोअर आहेत. त्याचबरोबर त्याचा वेगही कमी होऊन सुमारे 130 किमी/तास झाला आहे. यामुळे फलंदाज आधीच तयार राहतात आणि त्याचा फायदा घेतात.
बुमराहची खरी ताकद म्हणजे त्याचा वेग, यॉर्कर आणि अनपेक्षित बाऊन्स. पण जेव्हा वेग कमी होतो आणि स्लोअर बॉल्सचा अंदाज येतो, तेव्हा त्याची धार कमी होते. जर त्याने पुन्हा वेग आणि विविधता वाढवली, तर तो पुन्हा जुन्या फॉर्ममध्ये येऊ शकतो.






