केसांची वाढ थांबलीये? शरीरात असू शकते ‘या’ 3 व्हिटॅमिन्सची कमतरता; वेळीच सावध व्हा!

On: August 1, 2026 1:04 PM
Hair Growth
---Advertisement---

Hair Growth | दाट, मजबूत आणि लांबसडक केस मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनेक जण संतुलित आहार घेऊन आणि केसांची नियमित काळजी घेऊनही केसांची वाढ होत नसल्याची तक्रार करतात. तज्ज्ञांच्या मते, यामागे शरीरातील काही महत्त्वाच्या व्हिटॅमिन्सची कमतरता हे एक कारण असू शकते. त्यामुळे केवळ बाह्य काळजी न घेता शरीरातील पोषणाची स्थिती तपासणेही आवश्यक आहे.

या तीन व्हिटॅमिन्सची कमतरता ठरू शकते कारण :

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी (Vitamin D), व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) आणि बायोटिन (Biotin) या तीन पोषक घटकांची कमतरता असल्यास केसांची वाढ मंदावू शकते. व्हिटॅमिन डी नवीन हेअर फॉलिकल्स (Hair Follicles) तयार होण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात त्याची कमतरता निर्माण झाल्यास केवळ केस गळणेच वाढत नाही, तर नवीन केसांची वाढही प्रभावित होऊ शकते. ही कमतरता भरून काढण्यासाठी दररोज काही वेळ सकाळच्या उन्हात बसणे तसेच मशरूम, टोफू, अंड्यातील पिवळा भाग आणि सी-फूड (Seafood) यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी12 शरीरातील अशा पेशी तयार करण्यास मदत करते, ज्या केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वे पोहोचवतात. या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास केसांना पुरेसे पोषण मिळत नाही आणि त्यामुळे त्यांची वाढ मंदावते. शरीरातील व्हिटॅमिन बी12ची पातळी सुधारण्यासाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, पालक, बीट आणि भाजलेले चणे यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Hair Growth | बायोटिनची भूमिका महत्त्वाची :

तसेच तज्ज्ञांच्या मते, बायोटिनला अनेकदा ‘हेअर व्हिटॅमिन’ म्हणून ओळखले जाते. हे केराटिन (Keratin) या प्रथिनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते. केराटिनमुळे केस अधिक मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे बायोटिनची कमतरता असल्यास केस कमकुवत होऊ शकतात आणि त्यांची वाढही प्रभावित होऊ शकते.

बायोटिनची कमतरता दूर करण्यासाठी अखंड धान्ये, सुकामेवा, विविध बिया, अ‍ॅव्होकॅडो (Avocado), मासे, मशरूम, बाजरी, पालक, केळी, ब्रोकोली (Broccoli) आणि रताळे यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, केसांची वाढ कमी होत असल्यास स्वतःहून कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्याऐवजी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या करणे आणि त्यानुसार उपचार करणे अधिक योग्य ठरते.

News Title: 3 Vitamins Needed For Hair Growth

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now