Zodiac Signs | शनी (Shani) ग्रहाच्या वक्री भ्रमणाचा काळ सुरू असून, तो 11 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्माचा न्यायाधीश मानले जाते आणि त्याच्या प्रत्येक हालचालीचा परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. साधारणपणे शनीची वक्री अवस्था आव्हानात्मक मानली जाते. मात्र, या कालावधीत चार राशींसाठी करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत अनुकूल संधी निर्माण होण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘या’ चार राशींना मिळू शकतो लाभ :
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनीची वक्री चाल लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. जुन्या ओळखी आणि संपर्कांमधून नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत असून, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच सामाजिक मान-सन्मान वाढण्याबरोबरच एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते.
मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगतीचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, तसेच पदोन्नतीची संधीही मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित बाबींमध्येही समाधानकारक घडामोडी होऊ शकतात. मात्र, या संपूर्ण कालावधीत संयम आणि सातत्य राखणे आवश्यक असल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले जाते.
Zodiac Signs | आर्थिक प्रगतीचे संकेत :
तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री अवस्था मेहनतीचे चांगले फळ देणारी ठरू शकते. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायातून अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असून, नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याने आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत.
मकर राशीच्या व्यक्तींनाही या कालावधीत सकारात्मक परिणाम अनुभवता येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होण्याबरोबरच नफ्याच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या पद्धतीत सुधारणा झाल्याचे जाणवेल आणि वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पूर्वी आखलेल्या योजनांमधून फायदा होण्याची शक्यता असल्याने हा काळ प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.








