जास्त चहा पिताय? आरोग्यावर होऊ शकतो ‘हा’ गंभीर परिणाम

On: August 1, 2026 1:29 PM
Tea Side Effects
---Advertisement---

Tea Side Effects | अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. मात्र दिवसातून चार ते पाच कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, अतिप्रमाणात चहा घेतल्यास शरीरातील काही महत्त्वाच्या पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन B12 आणि लोहाच्या कमतरतेचा धोका :

तज्ज्ञांच्या मते चहामध्ये असलेले टॅनिन (Tannins) आणि कॅफिन (Caffeine) शरीरातील व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) आणि लोह (Iron) यांच्या शोषणात अडथळा निर्माण करू शकतात. विशेषतः जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास लोह शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते. परिणामी थकवा, अशक्तपणा, स्मरणशक्ती कमी होणे, मूडमध्ये बदल आणि रक्ताल्पता (Anemia) यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी (Vitamin C) हे शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते. मात्र जेवणानंतर लगेच चहा घेतल्यास या प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवण आणि चहा यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच दिवसातून दोन ते तीन कपांपेक्षा जास्त चहा घेणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tea Side Effects | हाडे, झोप आणि पचनावरही परिणाम :

मिळालेल्या माहितीनुसार, जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्यास शरीरातून कॅल्शियम (Calcium) बाहेर जाण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे हाडे कमकुवत होण्याची शक्यता वाढते आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) संबंधित समस्या जाणवू शकतात. दीर्घकाळ अतिप्रमाणात चहा घेत राहिल्यास ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) होण्याचा धोकाही वाढू शकतो.

याशिवाय अतिचहा पिण्यामुळे झोप न लागणे, ॲसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता तसेच हृदयाची धडधड वाढणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात, विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो. तज्ज्ञांच्या मते, हर्बल टी (Herbal Tea) किंवा ग्रीन टी (Green Tea) यांचा पर्याय निवडणे, तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, दही आणि पोषक आहाराचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. चहा ऊर्जा वाढवण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतो, मात्र त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

News Title: Too Much Tea Can Harm Health

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now