सेटवर काय घडलं होतं? आदिश वैद्यने मालिका सोडण्यामागचा ‘तो’ अनुभव सांगितला!

On: October 9, 2025 4:59 PM
Adish Vaidya
---Advertisement---

Marathi Serial | मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेता आदिश वैद्य (Adish Vaidya) सध्या चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेतून त्याने अचानक एक्झिट घेतली असून, या निर्णयामागचं कारण ऐकून चाहते थक्क झाले आहेत. वडील गंभीर आजाराशी लढत असताना, सेटवर झालेल्या धमक्या, शिवीगाळ आणि अंगावर धावून येण्याच्या घटनेमुळे आदिशला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. या घटनेनंतर मालिकेतील कलाकारांच्या सुरक्षिततेचा आणि कामाच्या वातावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वैयक्तिक संकट असतानाही काम करत होता :

अभिनेता आदिश वैद्यच्या (Adish Vaidya) वडीलांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. तरीही आदिश दोन मालिकांचं शूटिंग एकाचवेळी सांभाळत होता. त्याने स्वतः सांगितलं की सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत तो सातत्याने काम करत होता. मात्र, अशातच त्याला सेटवरून धमक्या देण्यात आल्या. “वडील अॅडमिट असताना मला हॉस्पिटलला जायचं होतं. हे मी आधीच कळवलं होतं. तरीही ‘गेलास तर बघतोच’ असं म्हणत संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केली आणि अंगावर धावून आला,” असं आदिशने सांगितलं.

अभिनेत्याने स्पष्ट केलं की, ही घटना त्याच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. “माझ्या दहा वर्षांच्या करिअरमध्ये कधीही अशी परिस्थिती आली नव्हती. सेटवर एखाद्याने वर्बल आणि फिजिकल अटॅक करणं म्हणजे कलाकाराच्या सन्मानावरच घाव आहे,” असं आदिश म्हणाला.

Marathi Serial | अभिनेता असणं सोप्प नाही :

आदिशने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “अभिनेत्याचं आयुष्य सोपं नाही. फक्त अभिनय नव्हे, तर सेटवरील प्रत्येक आव्हानंही आपण हँडल करतो. कलाकारांना सहज टार्गेट केलं जातं. पण काही वेळा स्वतःचा स्वाभिमान आणि कुटुंब यांच्यात संतुलन राखावं लागतं. मी माझ्या वडिलांसाठी काही निर्णय घेतले आणि ते मला घ्यावेच लागले.”

त्याने पुढे सांगितलं की, प्रोडक्शनमधील एका व्यक्तीचा इगो क्लॅश झाल्याने हे सगळं वाढलं. “दोन्ही मालिका एकत्र करण्याच्या अटीवर त्यांनी मला घेतलं होतं. मी प्रत्येक वेळेला वेळेत पोहोचत होतो, तरीही त्रास दिला गेला. हे कुठल्याही व्यावसायिक वातावरणाला शोभणारं नाही,” असं आदिशने सांगितलं.

आदिशच्या या उघडकीनंतर पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वातील कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वी ‘पारू’ मालिकेतील अभिनेता शंतनू गंगणेनंही अशाच प्रकारच्या वागणुकीविरोधात आवाज उठवला होता. वेळेवर मानधन न मिळणं, थकवणूक, सेटवर गैरवर्तन या सगळ्या समस्या अद्याप कायम असल्याचं अनेक कलाकार सांगतात. सध्या आदिश वैद्य आणि चॅनलमधील बोलणी सुरू असून, या प्रकरणात पुढील निर्णय काय घेतला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Title: Why did Adish Vaidya leave the series ‘Aaie Baba Retire Hot aahe’; Reveals shocking experience

Join WhatsApp Group

Join Now