जास्त मीठ खाणाऱ्यांनो आत्ताच व्हा सावध, WHO ने दिला महत्त्वाचा इशारा

On: February 21, 2025 4:21 PM
WHO Warning for Salt  
---Advertisement---

Salt | प्रत्येकाच्या घरात मीठ (Salt) असतं, जे अन्नाची चव वाढवतं. अनेकजण ते आरोग्यदायी मानतात, पण तुम्हाला माहिती आहे का, मीठ तुमच्या शरीरात हळू-हळू विषासारखे (slow poison) काम करते? यामुळे तुम्ही हळूहळू आजारी पडू शकता.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जास्त मीठ खाल्ल्याने दरवर्षी 19 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचा इशारा दिला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, उच्च रक्तदाब (high blood pressure), हृदयरोग (heart disease) आणि स्ट्रोकचा (stroke) धोका कमी करण्यासाठी सोडियमचे (sodium) प्रमाण कमी करून पोटॅशियमयुक्त (potassium) मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य तज्ञांचे मत

आरोग्य तज्ञ वारंवार सूचना देऊनही अनेक लोक आहारात जास्त प्रमाणात सोडियमचा समावेश करतात. जास्त मीठ खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्यामुळे अकाली मृत्यू (premature death) होऊ शकतो. त्यामुळे WHO ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात लोकांना मीठाऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडण्यास सांगितले आहे.

जास्त मीठ घातक का?

नसा सक्रिय ठेवण्यासाठी आणि शरीरातील द्रवांचा समतोल राखण्यासाठी मीठ आवश्यक आहे. परंतु, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास अनेक आजार वाढू शकतात. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात 19 लाख लोकांचा मृत्यू जास्त मीठ खाल्ल्याने होतो. सोडियमचे सेवन 2 ग्रॅमपेक्षा (अर्धा चमचा) जास्त नसावे, पण बहुतेक लोक दररोज 4.3 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खातात. 2013 मध्ये डब्ल्यूएचओच्या सदस्य देशांनी 2025 पर्यंत लोकांमध्ये सोडियमचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले होते, परंतु ऑस्ट्रेलियासह (Australia) बहुतेक देश हे लक्ष्य पूर्ण करू शकले नाहीत. आता हे लक्ष्य 2030 साठी पुन्हा निश्चित केले आहे.

डब्ल्यूएचओचा नवीन सल्ला

डब्ल्यूएचओने (WHO) नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पोटॅशियमयुक्त मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे, जो कमी सोडियमचा पर्याय आहे. यात सोडियम क्लोराईडऐवजी (sodium chloride) पोटॅशियम क्लोराईडचा (potassium chloride) वापर केला जातो. हा बदल रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतो आणि मृत्यूचा धोका कमी करू शकतो.

Title : WHO Warning for Salt  

 

Join WhatsApp Group

Join Now