Jay Pawar & Rutuja Patil l महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचे संकेत जय पवार आणि ऋतुजा पाटील (Jay Pawar & Rutuja Patil) यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले आहेत. गुरुवारी पुण्याजवळील घोटावडे फाटा येथील फार्म हाऊसवर हा सोहळा पार पडला. यावेळी पवार कुटुंबातील सर्वच थोरामोठ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचा साखरपुडा प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील हिच्यासोबत पार पडला. पाटील कुटुंब हे साताऱ्यातील फलटण येथील सहकार क्षेत्रात प्रसिद्ध आहे. या समारंभासाठी सुमारे ३०४ खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी ऋतुजाचे औपचारिक स्वागत करत तिला पवार कुटुंबात सामील केले. (Jay Pawar and Rutuja Patil Engagement)
शरद पवार- अजित पवार पुन्हा एका मंचावर :
राजकीय फाटाफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार अनेकदा एकमेकांविरोधात भूमिका घेताना दिसले. मात्र जय पवारच्या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघंही एकत्र आले. शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांची उपस्थिती विशेष आकर्षक ठरली. ही एकजूट राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण देणारी ठरली आहे. (Jay Pawar & Rutuja Patil)
Who is Rutuja patil : कोण आहे ऋतुजा पाटील? :
ऋतुजा पाटील ही फलटणच्या सहकार महर्षी हनुमंतराव पाटील यांची नात असून, तिचे वडील प्रवीण पाटील हे सोशल मीडिया क्षेत्रातील उद्योजक आहेत. ऋतुजा ही उच्चशिक्षित असून श्रीराम बाजार या स्थानिक मॉलची संचालक देखील आहे. ती पवार कुटुंबातील नव्या पिढीच्या पार्श्वभूमीत महत्वाची भूमिका बजावू शकते.
या सोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात पुन्हा सौहार्दाची भावना निर्माण होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे एकत्र येणे हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही महत्त्वाचे ठरू शकते. राजकारणापलीकडे नात्यांचे बंध अधिक घट्ट होणं हेच या साखरपुड्याचे खरे यश मानले जात आहे. (Jay Pawar and Rutuja Patil Engagement)






