नखांवर पांढरे डाग दिसतायत? तर शरीरात ‘या’ महत्त्वाच्या घटकाची असू शकते कमतरता

On: March 14, 2026 5:03 PM
Nail Health
---Advertisement---

White Spots On Nails | मानवी शरीरात होणारे छोटे-मोठे बदल अनेकदा आरोग्याबद्दल संकेत देत असतात. त्यामुळे त्वचा, केस किंवा नखांमध्ये दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. अनेकांना नखांवर लहान पांढरे डाग दिसतात आणि त्यामागे गंभीर आजार तर नाही ना, असा प्रश्न पडतो. या बदलामागे नेमकी कोणती कारणे असू शकतात याबाबत माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

नखांवरील पांढऱ्या डागांचे कारण काय? :

नखांवर दिसणाऱ्या लहान पांढऱ्या ठिपक्यांना अनेकजण कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण मानतात. काहींना ते गंभीर आजाराचे संकेत वाटतात. मात्र तज्ज्ञांच्या मते या डागांमागे अनेक कारणे असू शकतात आणि बहुतांश वेळा ते धोकादायक नसतात. तज्ज्ञांच्या मते नखांवर दिसणाऱ्या या पांढऱ्या डागांना वैद्यकीय भाषेत ‘ल्युकोनिचिया’ (Leukonychia) असे म्हणतात.

तज्ज्ञ सांगतात की या डागांमुळे शरीराला कोणताही गंभीर त्रास होत नाही. अनेकदा नखे वाढत गेल्यानंतर हे डाग वरच्या बाजूला सरकतात आणि नखे कापताना आपोआप निघून जातात. त्यामुळे ते बहुतांश वेळा आरोग्यासाठी धोकादायक नसतात. बऱ्याच वेळा नखांना झालेल्या किरकोळ दुखापतीमुळेही असे डाग तयार होतात. कधी नकळत लागलेला धक्का किंवा नखे वारंवार कापण्यामुळे नखांच्या पृष्ठभागावर बदल होऊन पांढरे डाग दिसू शकतात.

White Spots On Nails | पोषण आणि रसायनांचा परिणाम :

काही प्रसंगी शरीरातील पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळेही नखांवर पांढरे डाग निर्माण होऊ शकतात. झिंक, प्रथिने किंवा काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास नखांच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही समस्या दिसेलच असे नाही, पण वारंवार असे डाग दिसत असतील तर आहारातील पोषणाकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. (White Spots On Nails)

तसेच नेलपॉलिश, नेलपेंट रिमूव्हर किंवा इतर रासायनिक सौंदर्यप्रसाधनांचा जास्त वापर केल्यासही नखांवर परिणाम होऊ शकतो. या उत्पादनांमधील काही रसायने नखांचा बाह्य थर कमकुवत करतात आणि त्यामुळे पांढरे ठिपके किंवा रेषा दिसू लागतात. याशिवाय काही वेळा अ‍ॅलर्जी किंवा बुरशीजन्य संसर्गामुळेही नखांमध्ये बदल होऊ शकतात. जर नखं जाड होणे, तुटणे किंवा रंग बदलणे अशी इतर लक्षणे दिसू लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

News title : White Spots On Nails Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now