‘त्या’ हॉटेलमध्ये महिला डॉक्टरसोबत काय घडलं? पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

On: October 24, 2025 2:42 PM
pune news
---Advertisement---

Dr.Sampada Munde | सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने गुरुवारी रात्री आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हातावर लिहिलेल्या नोट मध्ये तिने पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने याच्यावर चारवेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने तिला गेल्या चार महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचाही उल्लेख केला आहे.

मूळची जळगावची रहिवासी असलेली ही महिला डॉक्टर (Dr.Sampada Munde) भाऊबीजच्या दिवशी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत पोहोचली होती. तिने हातावर लिहिलेल्या नोटीत तिच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट केले होते. या घटनेने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली असून, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

काय दिले मुख्यमंत्र्यांनी आदेश?

मूळची जळगावची (Dr.Sampada Munde) रहिवासी असलेली ही महिला डॉक्टर भाऊबीजच्या दिवशी साडे दहा वाजण्याच्या सुमारास फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या बंद खोलीत पोहोचली होती. तिने हातावर लिहिलेल्या नोटीत तिच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट केले होते. या घटनेने फलटणसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ माजली असून, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, आरोपी PSI गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमधील आहे आणि त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Satara Crime | दबावाचा मुद्दा:

महिलेच्या काकांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल बदलण्याचा दबाव तिला सात्याने दिला जात होता. त्यामुळे ती तणावात होती. तिच्या मृत्युपूर्वी तिने ही परिस्थिती हातावर लिहलेल्या नोटीमध्ये नमूद केली होती. तसेच, आलेल्या माहितीनुसार, डॉक्टरने हे टोकाचे पाऊल का उचलले, हॉटेलमध्ये कशी पोहोचली, आणि तिच्या मृत्यूमध्ये आणखी कोणी जबाबदार आहे का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आरोग्य व पोलिस यंत्रणेतून उठलेले प्रश्न या घटनेमुळे सातारा पोलिस यंत्रणा आणि आरोग्य खात्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पोलिसांच्या दुर्बल कारवाईमुळे आणि सत्तेचा गैरवापर होत असल्याचे आरोप वाढले आहेत. तसेच, महिलेच्या आत्तेभावाने राजकीय वादात बहिणीचा बळी गेल्याचे म्हटले आहे. खासदारांच्या दोन पीएंचा उल्लेख आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

सातारा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने तपास सुरू केला असून, आरोपी PSI गोपाल बदने यासह इतर संदिग्धांवरही चौकशी केली जात आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेतील घोटाळे, दबाव आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. आरोग्य आणि पोलिस खात्याने या प्रकरणावर त्वरित तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, अन्यथा या प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती निर्माण होते.

News Title- what happen with dr. sampada munde?

Join WhatsApp Group

Join Now