पावसाळ्यात मुलांमध्ये UTIचा धोका; पालकांनी अशी काळजी घ्या

On: July 23, 2026 3:33 PM
Monsoon Health
---Advertisement---

Monsoon Health | पावसाळ्यात मुले पावसात भिजल्यानंतर बराच वेळ ओल्या कपड्यांमध्ये राहतात, तसेच कमी पाणी पिणे आणि लघवी रोखून धरण्याच्या सवयींमुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (Urinary Tract Infection) होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः 3 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा संसर्ग अधिक आढळू शकतो. त्यामुळे पालकांनी स्वच्छतेबाबत आणि दैनंदिन सवयींबाबत विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ओले कपडे आणि चुकीच्या सवयी ठरू शकतात धोकादायक :

पावसाळ्यात मुलांमध्ये युटीआय (UTI) होण्याची शक्यता वाढते. पुणे (Pune) येथील 7 वर्षांच्या एका मुलीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, लघवी करताना जळजळ होणे आणि वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे अशी सुरुवातीची लक्षणे दिसून आली होती. सुरुवातीला पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले, मात्र नंतर ताप आणि पोटदुखी सुरू झाल्याने डॉक्टरांकडे नेल्यानंतर युटीआय (UTI) झाल्याचे निदान झाले.

तपासादरम्यान मुलगी शाळेतून आल्यानंतर पावसात भिजलेले कपडे बराच वेळ बदलत नव्हती. तसेच शाळेत वारंवार शौचालयात जावे लागू नये म्हणून ती पाणीही कमी पित होती. योग्य औषधोपचार, स्वच्छतेची काळजी आणि आवश्यक सवयींमध्ये बदल केल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. तज्ज्ञांच्या मते, मूत्रमार्गात जिवाणूंचा प्रवेश होऊन त्यांची वाढ झाल्यास युटीआय (UTI) होतो. याचा परिणाम मूत्राशय, मूत्रमार्ग आणि काही वेळा किडनीवरही होऊ शकतो.

Monsoon Health | लक्षणे ओळखा आणि त्वरित उपाय करा :

युटीआय (UTI) झाल्यास लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, वारंवार लघवी लागणे, ताप येणे, पोटदुखी किंवा कंबरेत वेदना जाणवणे, अंथरुण ओले करणे, उलट्या होणे, थकवा जाणवणे आणि लहान मुलांमध्ये चिडचिड वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. वेळेवर उपचार न झाल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचून पायलोनेफ्रायटिस (Pyelonephritis) सारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांच्या मते, पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे आणि अंतर्वस्त्रे त्वरित बदलावीत. मुलांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी, लघवी जास्त वेळ रोखून ठेवू देऊ नये आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुणे व वैयक्तिक स्वच्छता राखण्याची सवय लावावी. जननेंद्रियांचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे, स्वच्छ, सुती व सैल कपडे परिधान करणे तसेच शाळेत नेलेली पाण्याची बाटली नियमित संपवण्यास प्रोत्साहित करणेही महत्त्वाचे आहे. योग्य स्वच्छता, पुरेसे पाणी आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने मुलांना युटीआयसारख्या संसर्गापासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.

News Title: Wet Clothes Raise UTI Risk

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now