पुढील 3 दिवस धोक्याचे; हवामान विभागाने दिला अत्यंत महत्त्वाचा इशारा

On: May 6, 2024 7:38 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात अवकाळी पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या उन्हाळा ऋतु सुरू आहे. मात्र अवकाळी पावसामुळे हवामानात बदल राहणार असल्याची चर्चा आहे. अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. (Weather Update)

राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता

हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भामधील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

केवळ पाऊस पडणार नाहीतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग हा प्रति तास 30-40 किमी इतका असू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र गारपिटीबाबत हवामान खात्याने कोणतीही शंका उपलब्ध केली नाही. (Weather Update)

राज्यात सध्या उन्हाळ्यामुळे उष्मघाताचं प्रमाण अधिक झालं आहे. उन्हाच्या झळांमुळे अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. हवामान विभागाने दुपारी उन्हाळ्यात बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. (Weather Update)

अवकाळी पावसासोबत उन्हाच्या झळा

राज्यात अकोला आणि सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. या दोन शहरांमध्ये 44.3 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईमध्ये तापमान हे कोरडं राहणार आहे.

मात्र येत्या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस थैमान घालेल. यासाठी शेतकऱ्यांनी शक्य होईल ते काढणीला आलेली पिकं काढावीत, असा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे.

News Title – Weather Update News Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या

बायको म्हणावी की कसाई; नवऱ्याला बांधून ठेवलं नंतर प्रायव्हेट पार्टला दिले चटके

रोहित पवारांचा धक्कादायक दावा; अजित पवार अडचणीत?

“..तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं”; नाशकात शांतीगिरी महाराजांनी वाढवलं महायुतीचं टेंशन

नाशिकच्या राजकारणात जरांगे पाटलांची एंट्री?; घडामोडींना वेग

येत्या सहा दिवसांत ‘या’ राशींचे नशीब पालटणार; संपत्तीत होणार चिक्कार वाढ

Join WhatsApp Group

Join Now