वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल; आमदार सुरेश धस यांच्याबाबत गंभीर आरोप

On: July 21, 2025 5:24 PM
Beed News
---Advertisement---

Beed News | बीड जिल्ह्यातून मोठी राजकीय खळबळ निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराड (Walmik karad) यांचा जवळचा सहकारी संदीप तांदळे याने स्वतःच एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, या व्हिडीओमधील विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या व्हिडीओत तांदळे याने आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांच्याविषयी अश्लील भाषा वापरत गंभीर आरोप केले आहेत.

सर्वाधिक धक्का देणारा आरोप म्हणजे, आमदार सुरेश धस यांना काही गंभीर प्रकरणांमधून वाल्मिक कराड यांनी वाचवल्याचा दावा तांदळे याने या व्हिडीओत केला आहे. त्यामुळे आता या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे.

सराईत गुन्हेगाराच्या धमक्या, राजकीय संबंध उघड :

संदीप तांदळे हा पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असून त्याच्यावर खंडणी, पोक्सो आणि 307 सारख्या कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. बाळा बांगर यांच्यावर त्याने तीन गंभीर केसेस दाखल केल्या असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये तो स्पष्टपणे “आण्णा बाहेर आल्यानंतर सर्वांना बघतो,” अशी धमकी देताना दिसत आहे. (Beed News) 

तांदळे याचे संबंध थेट वाल्मिक कराड यांच्याशी आहेत, असंही या व्हिडीओमधून स्पष्ट होतं. त्यामुळे आता कराड यांच्यावर आरोप करणाऱ्या मंडळींना नव्याने उत्तर द्यावं लागणार आहे. यापूर्वी बाळा बांगर यांनीही कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

Beed News | महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत :

या व्हिडीओमुळे जुने प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. बाळा बांगर उर्फ विजयसिंह बांगर यांनी याआधीच असा दावा केला होता की, महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराडने (Walmik karad)  केली असून त्यानंतर आयव्हिटनेसलाही संपवण्यात आलं. या दाव्यांमुळे कराड यांच्यावर मोठं राजकीय आणि कायदेशीर दडपण आहे.

काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नीने आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी होण्याची मागणी आता नव्यानं होत आहे.

News Title: Walmik Karad’s Close Associate Releases Shocking Video Alleging MLA Suresh Dhas’s Protection

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now