वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल

On: April 17, 2026 4:49 PM
Walmik Karad Health
---Advertisement---

Walmik Karad Health | बीडमध्ये (Beed) गाजलेल्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांडाशी संबंधित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तुरुंगात असताना त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून डॉक्टरांकडून तपासण्या सुरू आहेत.

तुरुंगातून रुग्णालयात हलवण्याची वेळ :

वाल्मिक कराडला (Walmik Karad Health) तुरुंगात अस्वस्थता जाणवू लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सध्या डॉक्टरांकडून विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात असून त्यानंतरच त्याच्या आजाराबाबत स्पष्ट माहिती मिळणार आहे.

दरम्यान, रुग्णालयात नेताना त्याचा बदललेला शारीरिक अवतारही समोर आला. दीर्घ काळ तुरुंगात राहिल्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाल्याचे दिसत आहे. त्याचे केस पांढरे झाल्याचे, शरीर अशक्त झाल्याचे आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यामुळे त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Walmik Karad Health | प्रकृतीबाबत अनिश्चितता, सुरक्षा वाढवली :

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कराडच्या (Walmik Karad Health) समर्थकांनीही परिसरात गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सध्या त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारचा त्रास झाल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात त्याचा जामीन अर्ज अनेक वेळा न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्याला दिलासा दिलेला नाही. त्यामुळे तो सध्या न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत तुरुंगातच आहे.

News title : Walmik Karad Health Worsens in Jail

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now