vyomika singh | भारतीय सशस्त्र दल आणि विदेश मंत्रालयाच्या वतीने बुधवारी, ७ मे रोजी, आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंह (vyomika singh) यांनी पाकिस्तानला थेट शब्दांत इशाराही दिला. भारताच्या या कठोर भूमिकेमुळे सीमेपलीकडील दहशतवादी गटांना आणि त्यांच्या समर्थकांना स्पष्ट संदेश पोहोचला आहे.
परराष्ट्र सचिव आणि कर्नल कुरैशींकडून कारवाई-
या पत्रकार परिषदेच्या प्रारंभी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी सांगितले की, “आमच्या गुप्तचर यंत्रणेकडून भारतावर (India) आणखी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे अशा धोक्यांना वेळीच रोखणे आणि त्यांचा सामना करणे अत्यंत आवश्यक होते. आज सकाळी, भारताने अशा सीमापार हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर केला आहे.
ही कारवाई अत्यंत मोजूनमापून, कोणतीही चिथावणी न देता, योग्य प्रमाणात आणि जबाबदारीने केलेली आहे. दहशतवादाची पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना निष्प्रभ करणे यावर या कारवाईचा भर होता.”
कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हे ऑपरेशन-
यानंतर भारतीय सेनेच्या (Indian Army) कर्नल सोफिया कुरैशी (Colonel Sophia Qureshi) यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “६ ते ७ मे २०२५ च्या रात्री १ वाजून ५ मिनिटांपासून ते १ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान भारतीय सशस्त्र बलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती आम्ही देत आहोत. २२ एप्रिल रोजी पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते.
या कारवाईत नऊ दहशतवादी शिबिरांना लक्ष्य करून ती पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तानमध्ये गेल्या तीन दशकांपासून दहशतवादी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. ही ठिकाणे दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षणाची केंद्रे होती, जिथे मोठे दहशतवादी येत असत. मी (vyomika singh) हे स्पष्ट करू इच्छिते की, या हल्ल्यात कोणत्याही लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही आणि आतापर्यंत कोणतीही नागरिक जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.”
विंग कमांडर व्योमिका सिंहचा पाकिस्तानला इशारा-
या पत्रकार परिषदेच्या शेवटी विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. त्या म्हणाल्या की, “आम्ही पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” भारताच्या या स्पष्ट आणि खंबीर भूमिकेमुळे पाकिस्तानला भविष्यातील कोणत्याही गैरकृत्यांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “जर पाकिस्तानने भविष्यात कोणतीही चिथावणीखोर कारवाई केली, तर भारतीय लष्कर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.” या वक्तव्यातून भारताचा दहशतवादाशी कोणतीही तडजोड न करण्याचा आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार दिसून येतो.






