विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर; ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

Virat Kohli | क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा दोघही आपलं आयुष्य प्रायवेट ठेवत असतात. त्यांना वामिका आणि अकाय ही दोन मुले आहेत. अकायचा जन्म काही महिन्यांपूर्वीच झालाय.त्यामुळे अनुष्का सध्या बॉलीवुडपासून लांब आहे. तर, विराट देखील आयपीएलमुळे व्यस्त आहे.

अशात यांच्या दोघांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.यामध्ये तो निवृत्तीबद्दल मोठं भाष्य करताना दिसून येत आहे.या व्हिडीओनंतर अनुष्का शर्मा आपला पती आणि मुलांसह परदेशात शिफ्ट होणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगते आहे.

विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल

अनुष्काने लंडनमध्ये अकायला जन्म दिला. त्यांनी अजूनही लेक वामिका आणि मुलगा अकायचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अशात विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात विराटने आपल्या निवृत्ती आणि त्यानंतरच्या आयुष्याबाबतही एक हिंट दिली आहे. म्हणायला गेलं तर, अद्याप दोघांनीही यावर अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नाहीये. पण, सदर व्हिडिओमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट म्हणतोय,”एक खेळाडू म्हणून आमच्या करिअरमध्ये एक एक्सपायरी डेट असते. मी पाठिंबा देण्याचं काम करतोय. मी सातत्याने खेळू शकत नाही. मला कधीही पश्चाताप होणार नाही. जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत मी माझं 100% देईल. पण एकदाचा खेळून मी काही काळासाठी दिसणार नाही.”

“.. तेव्हा मी तुम्हाला लवकर दिसणार नाही”

विराट कोहलीच्या या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. चाहते वेगवेगळे अंदाज बांधू लागले आहेत. दुसरीकडे विराटची पत्नी अनुष्काने माझ्यासाठी कुटुंब महत्त्वाचं आहे, असं खुपवेळा म्हटलं आहे.

एका मुलाखतीमध्ये (Anushka Sharma) अनुष्का म्हणाली होती की, “मला माझ्या डोळ्याने वामिकाचं बालपण पाहायचं आहे”. त्यामुळे वामिका आणि अकायसाठी विराटने संन्यास घेतल्यानंतर अनुष्का शर्माही अभिनयक्षेत्राला रामराम करणार?, असा प्रश्न आता केला जातोय. मात्र, या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

News Title –  Virat Kohli video viral on social media

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट जारी

मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…

उद्धव ठाकरेंचा संबंध “भगव्याशी नाही तर फक्त हिरव्याशी”…’या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल

गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक