विराट कोहलीने विजयानंतर किस केलेल्या अंगठीचं रहस्य समोर!

On: February 24, 2025 1:10 PM
Virat Kohli Net Worth
---Advertisement---

Virat Kohli | विराट कोहलीने (Virat Kohli) दुबईतील (Dubai) स्टेडियममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात पुन्हा एकदा आपली जादू दाखवत शानदार शतक झळकावले. या शतकासोबतच भारताला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीम इंडियाचे (Team India) तर कौतुक होत आहेच, पण विराटचेही तेवढेच कौतुक होताना दिसत आहे. भारताच्या विजयानंतर विराट कोहलीने नेहमीप्रमाणे मैदानावरून पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma) व्हिडिओ कॉल (Video Call) केला आणि विजयाचा आनंद शेअर केला. पण त्याआधी विराटने केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भारताने ट्रॉफी जिंकताच विराटने त्याच्या गळ्यातील चैन काढली आणि त्यातील अंगठीला किस केले. हे चित्रही अनेकदा मैदानावर पाहायला मिळाले आहे. दुबईच्या मैदानावर भारताने पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) हरवून विजय मिळवला. या विजयाचे श्रेय विराट कोहलीला जाते. सामना संपताना कोहलीने आपले शतक साजरे केले. दुबईचे स्टेडियम ‘भारत’ आणि ‘विराट’च्या नावाच्या घोषणांनी दुमदुमून गेले.

अंगठीचे रहस्य

शतक पूर्ण होताच कोहलीने नेहमीप्रमाणे आकाशाकडे बॅट उंचावत देवाचे आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर त्याने गळ्यातील लॉकेट (Locket) टी-शर्टच्या बाहेर काढले आणि त्यातील अंगठीला किस केले. हे पाहून सर्वांनाच कोहलीच्या भावनांचा अंदाज आला. हे चित्र अनेकदा मैदानावर पाहिले गेले आहे. अनेकांना प्रश्न पडतो की या अंगठीमागील रहस्य काय आहे? तर ही अंगठी पत्नी अनुष्का शर्माची आहे. त्या अंगठीला तो त्याच्या आयुष्यातील ‘लक’ (Luck) मानतो. त्यामुळे ती अंगठी त्याच्या गळ्यातील चैनमध्ये नेहमीच असते.

विराटच्या कारकिर्दीतील प्रत्येक चढ-उतारात अनुष्का त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. कोहलीच्या संघर्षाच्या दिवसांमध्येही तिने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यामुळेच विराट त्याच्या या शानदार शतकाचे आणि विजयाचे श्रेय अनुष्काला देतो. भारताच्या विजयानंतर अनुष्काने इंस्टाग्रामवर (Instagram) कोहलीचा फोटो शेअर करत त्याचे कौतुक केले. या फोटोवर तिने रेड हार्ट (Red Heart) आणि दोन हात जोडलेले इमोजी (Emoji) लावून प्रेम व्यक्त केले.

अनुष्काला केले जात होते ट्रोल

विराट (Virat Kohli) आणि अनुष्का जेव्हा एकमेकांना डेट करत होते, तेव्हा अनुष्का अनेकदा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असायची. जेव्हा जेव्हा कोहलीची मैदानावरची कामगिरी चांगली होत नव्हती, तेव्हा अनुष्काला अनेक वेळा ट्रोल केले गेले. २०१५ च्या विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर कोहलीवर प्रचंड टीका झाली होती. मात्र, त्यावेळीही अनुष्का आणि विराटने याकडे दुर्लक्ष करत पुढचा खेळ कसा चांगला होईल याकडेच लक्ष दिले. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावून कोहलीने पुन्हा एकदा त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवत चाहत्यांचा विश्वास कायम ठेवला आहे.

Title : Virat Kohli Video Calls Wife Anushka After Victory Celebrates by Kissing Ring

 

Join WhatsApp Group

Join Now