Virat Kohli Anushka | रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bengaluru) संघाने सलग दुसऱ्यांदा आयपीएल २०२६ (IPL 2026) चे विजेतेपद मिळवल्यानंतर खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. अंतिम फेरीत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर हॉटेलमध्ये पोहोचलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने विजयाच्या आनंदात पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिच्यासोबत ठेका धरला. RCB टीमचा जिंकल्यानंतरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विजयाच्या आनंदात विराटकडून डान्स फ्लोअरवर कल्ला
नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) वर झालेला हा महाअंतिम सामना जिंकल्यानंतर सर्व संघ हॉटेलमध्ये परतला. यावेळी किंग कोहलीने स्वतःला डान्स करण्यापासून रोखले नाही. त्याने अतिशय उत्स्फूर्तपणे आपली पत्नी अनुष्काचा हात धरला आणि तिला डान्स फ्लोअरवर खेचून आणले. नवऱ्याच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे ती क्षणभरासाठी ओशाळली, मात्र विराटने आपला हट्ट सोडला नाही आणि आनंद व्यक्त करणे सुरूच ठेवले.
अनुष्कासोबत ठेका धरल्यानंतर या स्टार फलंदाजाने आपला मोर्चा सपोर्ट स्टाफ आणि संघाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्याकडे वळवला. त्याने कार्तिकलाही आपल्यासोबत नाचण्यासाठी डान्स फ्लोअरवर बोलावले. सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरल्याचा आनंद गगनात मावत नसल्याने, काही काळ हा दिग्गज खेळाडू एकटाच थिरकताना दिसला. सोशल मीडियावर त्याच्या या बेधडक आणि आनंदी अंदाजाचा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
𝗞𝗶𝗻𝗴 𝗞𝗼𝗵𝗹𝗶’𝘀 𝗺𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗰𝗹𝗮𝘀𝘀 𝗼𝗻 𝘁𝗵𝗲 𝗱𝗮𝗻𝗰𝗲 𝗳𝗹𝗼𝗼𝗿 😉
Pure vibes. Wholesome. And so much more. Anushka Sharma, thank you for being our Day 1. ❤️ pic.twitter.com/7Qmxxv6QtG
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 1, 2026
बंगळूरची दमदार फलंदाजी आणि सलग दुसरे विजेतेपद
या खिताबी लढतीत बंगळूरचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) याने नाणेफेकीचा कौल जिंकत गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. गुजरातची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. संपूर्ण हंगामात उत्कृष्ट लयीत असलेले शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudharsan) या महत्त्वाच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. परिणामी मधली फळीही कोसळली. तरीही वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने ५० धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि संघाला १५५ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि विराटने संघाला पुन्हा एकदा मजबूत सुरुवात करून दिली. अय्यर ३२ धावांवर माघारी परतला, परंतु विराटने एका बाजूने किल्ला लढवत नाबाद ७५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. याशिवाय टीम डेव्हिड (Tim David) ने २४, कर्णधार पाटीदारने १५ आणि जितेश शर्मा (Jitesh Sharma) ने ११ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या खेळींच्या जोरावर बंगळूरने १६१ धावा करत ५ गडी राखून आणि १२ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात टाकला.
News Title: Virat Kohli Anushka Dance After IPL Victory video viral on social media






