Virar Triple Murder | विरारमध्ये (Virar) बुधवारी (२६ फेब्रुवारी) एकाच घरात तीन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पोलीस (Police) तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. आर्थिक विवंचनेतून पित्यानेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि मुलीला ठार मारल्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या (Suicide) करून जीवन संपवले. उदयकुमार काजवा (Udaykumar Kajva) असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या (Virar Suicide Case) करण्यापूर्वी पत्नी विना आणि मुलगी शिवालिका यांनाही संपवले. (Virar Triple Murder)
आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल
अधिक माहितीनुसार, विरारमध्ये (Virar) एकाच घरात तीन मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. आर्थिक विवंचनेला कंटाळून पित्याने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. उदयकुमार काजवा (Udaykumar Kajva) असे पित्याचे, विना काजवा (Vina Kajva) पत्नीचे, तर शिवालिका काजवा (Shivalika Kajva) असे मुलीचे नाव आहे. हे कुटुंब विरार (Virar) पश्चिम येथील ग्लोबल सिटीमधील (Global City) मैत्री हाईट्सच्या (Maitri Heights) दहाव्या मजल्यावर राहत होते.
लाईट बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित
उदयकुमार (Udaykumar) बेरोजगार होता, तर पत्नीला दुर्धर आजार होता. पत्नी खासगी शिकवणी घेऊन घरखर्च चालवत होती. दोन दिवसांपूर्वी लाईट बिल न भरल्याने महावितरणने (Mahavitaran) वीजपुरवठा खंडित केला होता. ११ वर्षांचा वेदांत काजवा (Vedant Kajva) हा मात्र शाळेत गेल्यामुळे वाचला. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात (J. J. Hospital) पाठवण्यात आले आहेत. बोळींज पोलीस ठाण्यात (Bolinj Police Station) अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत. (Virar Triple Murder)
Title : Virar Triple Murder Father Kills Wife and Daughter






