विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!

On: May 2, 2024 9:07 PM
Ahmednagar
---Advertisement---

Ahmednagar | लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके (Nilesh Lanke ) यांनी गुरुवारी राळेगणसिद्धी येथे येत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

लंके यांनी निवडणूक प्रक्रिया दरम्यान राबविलेल्या यंत्रणेबाबत हजारे यांना माहिती दिली. दोन-अडीच महिन्याच्या कालावधीत मतदार संघातील गावा गावात संपर्क केल्याचे लंके यांनी सांगितल्यानंतर इतक्या मोठ्या मतदार संघात केलेल्या संपर्काविषयी हजारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. हजारे म्हणाले सध्या मोठ्या प्रमाणात उष्णता असून उन्हाची काळजी घेऊन प्रचार करा, असा सल्ला हजारे यांनी लंके यांना दिला.

अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात

हजारे म्हणाले आमदार म्हणून काम करताना नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गेल्या साडेचार वर्षात भरीव काम केले आहे. मतदारसंघातील जनतेपुढे त्यांचे काम आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पारनेर तालुक्याचा प्रतिनिधी लोकसभेत जाण्याची यंदा संधी आहे. संधीचे सोने करा, असा सल्ला अण्णा हजारे यांनी यावेळी दिला.

गैरसमज पसरवणं चुकीचं

अलीकडेच या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे हे आपल्या भेटीला आले होते. निवडणुकीतील सर्वच उमेदवार आपल्या भेटीसाठी येतात. आपण त्यांना आशीर्वाद देतो, परंतु विखे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आपले विखे यांना समर्थन असल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. हे योग्य नाही. गैरसमज पसरविणे चूकीचे नसल्याचे सांगत हजारे यांनी नाराजी व्यक्त केली.

लंकेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत स्वत: लंकेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचंही लंके यांनी या भेटीनंतर म्हटलं आहे

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुमच्यामुळे माझी आई गेली’; गावकऱ्याने सुजय विखेंना विचारला जाब

सुरेश रैनावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू

पुणे हादरलं! शाळेतील व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ

सलमान खान गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाचा धक्कादायक दावा!

निलेश लंकेंचा मोठा डाव; सुजय विखेंची कोंडी?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now