“अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल”

On: November 13, 2023 3:34 PM
---Advertisement---

मुंबई | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. पुढच्या वेळेस अजित पवारांना भाजपच्या तिकिटावरच लढावं लागेल असं मला एकंदरीत दिसतं आहे. कमळावर लढल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मी पूर्णपणे खात्रीने सांगू शकतो अजित पवार गटाला कमळाबाईचा आशीर्वाद असेच होणार, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

आता रडण्याची स्थिती अजित पवारांवर आली असेल, कारण भारतीय जनता पक्षमध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सोडतात. त्यामुळे सडण्याची आणि रडण्याची वेळ अजित पवारांवर आली असावी, अशी बोचरी टीकाही वडेट्टीवारांनी केलीये.

अजित दादा कधी खुश राहिले? ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झालं, तर खूश. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. हम करे सो कायदा, आम्ही तसे वागू अशी त्यांची भूमिका आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये त्यांना वाटतं निधी मिळत नाही, अरे तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे, तरी निधीसाठी का रडता? आता तुमची धमक दाखवा?, असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांना दिलं.

निधी मिळत नाही, म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का? निधी मिळत नाही असे सांगून रडण्यापेक्षा दुसऱ्याना रडवण्याची हिंमत आहे का? हे दादांनी आता दाखवावं, असंही त्यांनी म्हटलंय.

संजय राऊत म्हणतात त्या प्रमाणे ते दिल्लीचे चरणदास झाले आहेत. आता ते दादागिरी दाखवू शकत नाहीत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

अत्यंत भयंकर प्रकार; सलमानच्या एंट्रीनंतर चाहत्याने केलं असं काही की… 

एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल; 100 गाड्या एकमेकांवर धडकल्या

“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली… 

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now