“राज ठाकरेंना आताच एवढा पुळका का?, भाजपची राज ठाकरेंनाही धमकी?”

On: May 11, 2024 4:56 PM
Vijay Wadettiwar criticizes Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात भाजपाला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज ठाकरे सध्या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून देखील जोरदार प्रचार केला जातोय. अशात काल, शुक्रवारी पुणे शहरात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभा घेतली.

या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. मशिदींमधून मौलवी फतवे काढत असतील तर, मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा.असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. यावरून आता राज ठाकरे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आले आहेत. ठाकरेंची ही बदललेली भाषा विरोधकांना रुचत नाहीये.

यावरून राज ठाकरेंना फाईल दाखवून भाजपने प्रचाराला लावलं असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.

“दिल्लीत बोलावून फाइल दाखवल्या, म्हणून..”

“राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या लाईन मध्ये फिट होते. पण, त्यांना दिल्लीत बोलावून काही फाईल दाखवल्या गेल्या आणि सांगितलं गेलं की, प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून त्यांना आज अशा पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागतोय.”, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

“2019 च्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) मोदी- शाहांवर टीका करताना त्यांना हुकूमशाह म्हणत होते. मात्र, आता त्या हुकूमशाहीचा अचानक एवढा काय पुळका आलाय?”, असा सवाल देखील यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

“राज ठाकरेंना आता एवढा पुळका का?”

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. “दुसऱ्याचा आत्मा भटकतो म्हणणाऱ्यांना एवढी भटकंती का करावी लागत आहे? याचे उत्तर स्पष्ट आहे की त्यांचा पराजय निश्चित आहे. त्यामुळे त्यांना दुप्पट नाही तिप्पट सभा घ्यावा लागत आहेत.”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

News Title –  Vijay Wadettiwar criticizes Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?

अजित पवारांचे विश्वासू नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार?;’त्या’ फोटोमागील सत्य समोर

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस चांगला पडणार

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

Join WhatsApp Group

Join Now