ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

On: March 15, 2026 10:17 AM
Madhu Malhotra Passes Away
---Advertisement---

Bollywood Actress Passes Away |  मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी 13 मार्च रोजी मुंबई (Mumbai) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अनपेक्षित निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

72 वर्षी जगाच निरोप घेणारी ही अभिनेत्री आहे मधु मल्होत्रा. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. जॅकी श्रॉफ यांच्या गाजलेल्या ‘हिरो’ चित्रपटात त्यांनी काम केले होते. याच चित्रपटातील ‘लम्बी जुदाई’ या अजरामर गाण्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळाली आणि हे गाणे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

1970 आणि 1980 चे दशक त्यांनी खऱ्या अर्थाने गाजवले. जरी त्या कायम मुख्य प्रसिद्धीच्या झोतात राहिल्या नसल्या, तरीही त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला त्यांनी अचूक न्याय दिला. त्यांच्या याच प्रामाणिक कामामुळे त्यांनी सिनेरसिकांच्या मनात आपली एक वेगळीच आणि हक्काची जागा निर्माण केली होती.

रुपेरी पडद्यावरील त्यांचा वावर नेहमीच लक्षवेधी ठरला. ‘हिरो’ व्यतिरिक्त त्यांनी ‘सत्ते पे सत्ता’ (Satte Pe Satta), ‘कर्ज’ (Karz), ‘कयामत’ (Qayamat), ‘रिश्ता कागद का’ (Rishta Kagaz Ka) आणि ‘विश्वनाथ’ (Vishwanath) यांसारख्या अनेक सुपरहिट आणि गाजलेल्या सिनेमांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. या सर्वच सिनेमांमधील त्यांच्या विविधांगी कामाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले होते.

दरम्यान, निधनाच्या या दुःखद बातमीनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. अनेक नामवंत कलाकार आणि फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मधु मल्होत्रा आज आपल्यात शारीरिकदृष्ट्या उपस्थित नसल्या, तरी त्यांनी रुपेरी पडद्यावर जिवंत केलेली बहुढंगी पात्रे आणि त्यांचे सिनेमे रसिकांच्या स्मरणात कायमस्वरूपी राहतील.

Join WhatsApp Group

Join Now