जावयांनो… सासरवाडीतून ‘या’ गोष्टी आणणे पडेल महागात! मुलींनी ‘हे’ नक्की वाचा

On: June 9, 2026 12:43 PM
---Advertisement---

Vastu Shastra | अधिक मास (Adhik Maas) सुरू असताना अनेक ठिकाणी जावयाला वाण देण्याची परंपरा पाळली जाते. विष्णुस्वरूप मानल्या जाणाऱ्या जावयाचा सन्मान म्हणून सासरकडून विविध भेटवस्तू दिल्या जातात. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू सासर किंवा माहेर येथून स्वीकारणे अथवा आणणे टाळावे, असे सांगितले जाते. अशा वस्तूंमुळे शनि, राहू आणि शुक्र यांचे प्रतिकूल परिणाम वाढू शकतात, अशी मान्यता आहे.

लग्नानंतर वस्तूंची देवाणघेवाण कशी असावी? :

वास्तुशास्त्रामध्ये घरातील वातावरण, नाती आणि आर्थिक स्थिती यांच्यावर परिणाम करणाऱ्या अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार विवाहानंतर सासर-माहेर यांच्यात होणाऱ्या वस्तूंच्या देवाणघेवाणीबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक मानले जाते. मुलांनी सासरकडून किंवा मुलींनी माहेरकडून कोणतीही वस्तू विनाकारण अथवा मोफत स्वरूपात घेणे योग्य नसल्याचे सांगितले जाते.

मान्यतेनुसार अशा कृतींमुळे घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असून ग्रहदोषांचा प्रभावही तीव्र होऊ शकतो. त्यामुळे काही वस्तू स्वीकारताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः पुरुषांनी सासरकडून मिळणाऱ्या काही भेटवस्तूंबाबत अधिक सावध राहावे, असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे.

Vastu Shastra | इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून झाडूपर्यंत; महिलांनीही घ्यावी खबरदारी :

वास्तुशास्त्रानुसार इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संबंध राहू ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे सासरकडून कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू गरज नसताना किंवा विनामूल्य स्वरूपात स्वीकारल्यास राहू दोष वाढू शकतो, अशी धारणा आहे. यामुळे अचानक खर्च वाढणे, आर्थिक संतुलन बिघडणे आणि पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच काळ्या रंगाचे कपडे, ब्लँकेट किंवा तत्सम वस्तू सासरकडून भेट म्हणून घेणेही टाळावे, कारण काळा रंग शनिदेवाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे जीवनातील संघर्ष, कामातील अडथळे आणि मानसिक तणाव वाढू शकतो, असे म्हटले जाते.

महिलांसाठीही काही विशेष सूचना दिल्या जातात. माहेरहून झाडू आणून सासरी वापरणे अशुभ मानले जाते, कारण झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू माहेरहून आणल्यास नातेसंबंधांमध्ये मतभेद आणि कटुता वाढू शकते, अशी मान्यता आहे. याशिवाय सासरकडून जड लोखंडी वस्तू मोफत स्वीकारणे टाळावे, कारण त्यामुळे अडचणी किंवा अपघातांचा धोका वाढू शकतो. जुनी वर्तमानपत्रे, रद्दी कागद किंवा वापरात नसलेली पुस्तके माहेरहून आणल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे.

News Title: Vastu Tips for In-Laws Gifts

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now