तुळशीजवळ ‘या’ वस्तु कधीच ठेऊ नका, अन्यथा लक्ष्मी नाराज होऊन घरात येईल आर्थिक टंचाई!

On: April 25, 2025 9:55 AM
Vastu Tips  Avoid These Things Near Tulsi Plant
---Advertisement---

Vastu Tips | सनातन धर्मात अनेक वृक्ष आणि वनस्पतींना पवित्र मानलं जातं. त्यापैकी तुळशीच्या (Tulsi plant) रोपाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. लक्ष्मीमातेचा वास या पवित्र वनस्पतीत मानला जात असल्याने तिच्या सान्निध्यात काही गोष्टी ठेवणं अशुभ ठरू शकतं, असा इशारा वास्तुशास्त्रात (Vastu Tips ) देण्यात आला आहे.

तुळशीचे धार्मिक महत्त्व  

धार्मिक दृष्टिकोनातून भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे रोज सकाळी या पवित्र वनस्पतीची पूजा केल्यास धनलाभाचे योग निर्माण होतात आणि आर्थिक तणाव कमी होतो, असं मानलं जातं. मात्र वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुळशीपाशी काही वस्तू ठेवणं टाळावं लागतं. अन्यथा नकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात समस्या उद्भवतात.

तुळशीजवळ योग्य वस्तू ठेवणं महत्त्वाचं असतं कारण तिथे लक्ष्मीमातेचा वास मानला जातो. जर चुकीच्या वस्तू तिथे ठेवल्या गेल्या, तर त्या पवित्र ठिकाणी दूषितता निर्माण होते आणि लक्ष्मीमाता नाराज होऊ शकतात. त्यामुळे अशा चुका टाळणं आवश्यक आहे.

या वस्तूंनी होतो लक्ष्मीमातेचा अपमान

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीजवळ कधीही कचरा किंवा कचराकुंडी ठेवू नये. अस्वच्छता लक्ष्मीमातेचा अपमान समजला जातो. त्यामुळे साधकाला दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे, जिथे तुळशी लावली आहे त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या वस्तू ठेवणं देखील अशुभ मानलं जातं. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक असल्याने घरात नकारात्मक शक्तींचं प्रमाण वाढतं आणि अनेक संकटं निर्माण होऊ शकतात.

तुळशीजवळ काटेरी झाडं ठेवण्यासही मनाई आहे. काटेरी वनस्पतींमुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे लक्ष्मीमातेचा वास त्या जागेवर राहात नाही आणि घरात कलह, अडचणी वाढू शकतात. तसेच, जूने किंवा वापरलेल्याचपला-जोडी देखील तुळशीच्या आसपास ठेवू नयेत. असे केल्यास देवतेचा अपमान होतो आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे पाप समजलं जातं.

वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे की, घरात तुळशी उत्तर (North) किंवा पूर्व (East) दिशेला लावली पाहिजे. या दिशांना शुभ मानलं जातं आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा व लक्ष्मीमातेची कृपा टिकून राहते. मात्र, दक्षिण-पूर्व (South-East) दिशेला तुळशी लावणं टाळावं. या दिशेला तुळशी ठेवल्यास अपेक्षित फलित मिळत नाही आणि अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढते.

Title : Vastu Tips  Avoid These Things Near Tulsi Plant

Join WhatsApp Group

Join Now