“दीर आणि सासू यांनी शारीरिक…”, वैष्णवी हगवणेच्या वडिलांचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात चर्चा

On: May 19, 2025 1:25 PM
Vaishnavi Hagawane Case
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | पुणे जिल्ह्यातील भुकूम (Bhukum) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेंनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २३ वर्षांची वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) यांनी शुक्रवारी (१६ मे) दुपारी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं.

हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) यांच्या आत्महत्येमागे पतीसह सासरच्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. आनंद ऊर्फ अनिल कस्पटे (Anil Kasapte) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी यापैकी पती, सासू आणि नणंदला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिला वेळोवेळी त्रास दिला, मारहाण केली आणि मानसिक छळ केल्यामुळे वैष्णवीने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.

घरातच गळफास घेत आत्महत्या-

शुक्रवारी दुपारी वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) यांनी बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. पती शशांक दरवाजा वाजवत होता, परंतु प्रतिसाद न आल्याने त्याने दरवाजा तोडला आणि ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. वैष्णवीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. शवविच्छेदन पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) करण्यात आलं.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. आरोपी राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी असल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे. पोलीस अधिक तपास करत असून, घटनेनंतर परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

News Title – Vaishnavi Hagawane fathers revealed about her in laws

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now