आत्महत्येपूर्वी गाडीत सासूकडून मारहाण, वैष्णवी हगवणेबद्दल नवे खुलासे समोर!

On: May 19, 2025 3:36 PM
Vaishnavi Hagawane Case
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) हिने पुण्यातील मुळशी तालुक्यातील भूकूम (Bhukum) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी सायंकाळी घडली असून, या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन कोटींच्या मागणीचा दबाव, सासरच्या मंडळींचा क्रूर छळ-

वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) यांनी तिच्या घरातील बेडरूममध्ये दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांकने दरवाजा तोडला आणि तातडीने तिला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या.

तक्रारीनुसार, शशांक हगवणे याने वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. जमीन खरेदीसाठी पैसे न दिल्यास, ‘आमची राजकीय प्रतिष्ठा आहे, आम्ही भुकुममधील मोठे लोक आहोत, तुम्ही आमच्या बरोबरीचे नाही’ असे म्हणून वैष्णवीला धमकी दिली आणि मारहाण केली. यानंतर तिच्या माहेरी परत पाठवण्यात आलं.

सासूकडून मारहाण, चारित्र्यावर संशय-

मार्च २०२५ मध्ये सासू लता हगवणे आणि वहिनी करिश्मा हगवणे यांनी किरकोळ कारणावरून वैष्णवीला शिवीगाळ, मारहाण केली आणि तिच्या तोंडावर थुंकले. त्यांनी तिला गाडीत बसवून वाकड येथे नेले आणि वाटेतही मारहाण केली. वैष्णवीने “मी उडी मारेन” असं म्हटल्यानंतरच मारहाण थांबवली, असा आरोप तक्रारीत आहे.

या प्रकरणी वैष्णवीच्या (Vaishnavi Hagawane) वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा पती शशांक, सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता, मेहुणी करिश्मा आणि मेहुणा सुशील हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काहींना अटकही करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

आधी देखील आत्महत्येचा प्रयत्न-

ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या पती शशांक हगवणे याने या बाळावर संशय घेत “हे मूल माझं नाही” असा आरोप करत तिच्यावर हात उगारला आणि घराबाहेर हाकलून दिलं. त्यानंतर सासरच्या लोकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती औंध येथील खाजगी रुग्णालयात दाखल होती. त्या काळात तिच्या सासरच्या कुणीही तिला भेट दिली नाही, असा आरोप तक्रारीत नमूद आहे.

News Title – vaishnavi hagawane Faced Abuse by in laws

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now