Vaishnavi Hagawane | पुण्यातील भुकूम येथे राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेने (Vaishnavi Hagawane) हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 2025 मध्येही अजूनही हुंड्यासारख्या विषारी प्रथांना राजकीय संरक्षण दिलं जातंय का, असा सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राजकीय दोन चेहेरे?
सरकारने ‘लाडली बहिण’ योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, परंतु त्याच पक्षातील नेत्यांच्या कुटुंबात हुंड्यासाठी स्त्रियांचा छळ होतो, हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणं आहे. एका बाजूला महिलांना सबलीकरणाच्या घोषणा, आणि दुसऱ्या बाजूला सासरच्या मंडळींकडून मारहाण, संशय, आणि मानसिक छळ – हे विरोधाभास जनतेला अस्वस्थ करत आहेत.
रुपाली चाकणकर यांचा आवाज कुठे गेला?
सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर बिनधास्त मत मांडणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची या प्रकरणात अजून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एरवी चित्रपटात एखादा बोल्ड सिन आला की बंदी आणि कारवाईची मागणी करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आता कुठे आहेत? ह्या प्रकरणी महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी आणि जनजागृती मोहीम राबवावी अशी माझी मागणी आहे. ह्या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे!
महिला आयोग आणि सरकारने तातडीने कारवाई करावी
या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यापुढे तातडीने (Vaishnavi Hagawane) आणि कठोर कारवाई व्हावी, अशी जनतेची आणि महिला संघटनांची जोरदार मागणी आहे. यासोबतच महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि आयोगांनी जनजागृती मोहीम राबवावी, हुंडा आणि स्त्री छळाविरुद्ध कडक पावलं उचलावीत, अशी ठाम भूमिका अनेक नागरिकांनी मांडली आहे.
News Title – Vaishnavi Hagawane Dowry Death Raises Questions on Women’s Commission






