Hagawane Family | पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू (Vaishnavi Hagawane death) प्रकरणातील आरोपींना काल त्यांची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी धक्कादायक युक्तिवाद करत वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हगवणे कुटुंबाने (Hagawane family) वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले की, वैष्णवीचे एका परपुरुषासोबत ‘चॅट’ सुरू होते आणि ते त्यांना सापडले होते. याच कारणामुळे त्यांनी तिला तिच्या माहेरी पाठवले होते. वैष्णवीच्या ‘चॅट’ची तपासणी करण्याची मागणीही हगवणे कुटुंबाने न्यायालयासमोर केली. माध्यमांतून कस्पटे कुटुंबाने ५० लाखांची फॉर्च्युनर गाडी दिली असे सांगितले जात असले तरी, आपल्याकडे यापूर्वीच ५ कोटींच्या गाड्या होत्या, त्यामुळे ५० लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी आपण तिचा छळ का करू, असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला.
हगवणेंच्या हावरटपणाचा एक व्हिडिओ समोर
हगवणेंकडे ५ कोटींची वाहने असताना त्यांनी फॉर्च्युनरची मागणी का करावी, असा प्रश्न विचारणाऱ्या त्यांच्या हावरटपणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ ‘अधिकमासा’तील असून, त्यात जावई शशांक आणि हगवणे कुटुंबाचा स्पष्टपणे हावरटपणा दिसून येत आहे.
पाच कोटींची वाहने आम्ही फॉर्च्युनरची का मागू म्हणणाऱ्या हावरट हगवणेंची पोलखोल करणारा व्हिडीओ समोर#punenews #crimenews #NCP #VaishnaviHagawane #VaishnaviHagawanedeath #VaishnaviHagawanedeathcase #SushilHagawane #pune pic.twitter.com/kuWy20mBBL
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) May 29, 2025
या व्हिडीओमध्ये शशांकने केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर त्याचा भाऊ सुशीलसाठीही हट्ट पुरवून घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे हगवणे कुटुंबाची सत्यता आणि त्यांची आर्थिक स्थितीबाबतचे दावे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Hagawane Family | लाखो रुपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह सोहळा :
कस्पटे कुटुंबाने जावई शशांक आणि सुशील यांना ‘अधिकमासा’त काय-काय दिले, याचा तपशीलही समोर आला आहे. त्यांना चांदीचे ताट, शशांकला सोन्याची अंगठी, तसेच शशांक आणि सुशील दोघांनाही चांदीचे निरंजन देण्यात आले होते. सुशीलला चांदीचे देवाचे तामनाचे ताट आणि ब्रँडेड कपड्यांचा पूर्ण पोशाखही देण्यात आला होता. वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर गाडी, सात किलो वजनाची चांदीची ताटे, भांडी आणि लग्नानंतर चांदीची मूर्ती दिली होती. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला ५० हजार ते १ लाख रुपये दिले जात होते. नुकताच जावयाला दीड लाखाचा एक फोनही दिला होता.
याव्यतिरिक्त, पुण्यात ‘सनीज वर्ल्ड’ येथे लाखो रुपये खर्च करून शाही थाटामाटात विवाह सोहळा आयोजित केला होता, ज्याची चर्चा पंचक्रोशीत होती. या सर्व तपशिलांवरून कस्पटे कुटुंबाने केलेल्या अफाट खर्चाची कल्पना येते, जो हगवणे कुटुंबाच्या तथाकथित ‘आर्थिक संपन्नते’च्या दाव्यांशी विसंगत आहे.








