Vaishnavi Hagawane Case | वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना, आता या प्रकरणात हगवणे कुटुंबाचे वकील अॅड. विपुल दुशींग यांनी कोर्टात मांडलेल्या युक्तिवादावरून मोठा वाद पेटला आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेल्या टिप्पणीमुळे समाजातून, कार्यकर्त्यांकडून आणि आता सेलिब्रिटींकडूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेमंत ढोमेचा थेट आक्षेप: “वकिलावरच केस फाईल करा!” :
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी X या सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत “वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय” असं लिहिलं आहे. त्यांनी अशा प्रकारच्या बुरसटलेल्या पुरुषी विचारसरणीचा निषेध केला आहे. ढोमे म्हणतात,
“हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे. कठीण आहे!”
या पोस्टला हजारो लाईक्स आणि शेकडो कमेंट्स मिळत असून, सोशल मीडियावर लोकांनी हेमंतच्या मताला मोठा पाठिंबा दिला आहे.
Vaishnavi Hagawane Case | काय आहे वकिलाचा वादग्रस्त युक्तिवाद? :
हगवणे कुटुंबाची बाजू मांडताना अॅड. विपुल दुशींग यांनी वैष्णवीचे चारित्र्य कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. (Vaishnavi Hagawane Case)
त्यांनी कोर्टात सांगितलं की, वैष्णवी ‘नको त्या व्यक्तीसोबत चॅट’ करत होती. वैष्णवीची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. नवऱ्याने कानाखाली मारणं हे छळ नव्हे, तर सामान्य गोष्ट असल्यासारखा युक्तिवाद करण्यात आला. यावरून मुलगी मरून गेल्यावर तिच्यावरच दोषारोप करणं कितपत योग्य? असा सवाल समाजातून मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.








