“हात,पाय, मांडी शिवाय हनुवटीवर…” ; वैष्णवी हगवणेच्या PM रिपोर्टमधून मोठी माहिती उघडकीस

On: May 19, 2025 3:56 PM
Vaishnavi Hagwane
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेची आत्महत्येची घटना आता गंभीर वळणावर आली आहे. १६ मे रोजी मुळशीतील भुकूम (Bhukum) येथे वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बावधन पोलीस ठाण्यात (Bavdhan Police Station) राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५१ तोळे सोने, फॉरच्युनर तरीही हुंड्याची मागणी?

२०२३ मध्ये वैष्णवी (Vaishnavi Hagawane) आणि शशांक हगवणे यांचा विवाह पुण्यातील सनीज वर्ल्ड (Sunny’s World) येथे मोठ्या थाटात पार पडला. विवाहात वधूपित्याने ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. तरीही, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास सुरू झाला. किरकोळ कारणांवरून वाद, चारित्र्यावर संशय, आणि सततच्या धमक्यांमुळे वैष्णवीचा मानसिक छळ सुरूच राहिला.

दोन कोटींची मागणी –

नोव्हेंबर २०२३ मध्ये शशांक हगवणे याने वडीलांकडून जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे वैष्णवीला “फुकट पोसणार का?” अशी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्यानंतर तिने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मार्च २०२५ मध्ये वैष्णवीला गाडीत बसवून वाकड येथे आणले गेले. वाटेत सासू आणि नणंदेने तिच्यावर मारहाण केली. वैष्णवीने “मी उडी मारेन” असे म्हटल्यावर मारहाण थांबवण्यात आली.

शेवटचा दिवस: शारीरिक जखमा आणि मृत्यू-

१६ मे रोजी सायंकाळी शशांक हगवणे याने प्रणव बहिरट याला कॉल करून सांगितले की, वैष्णवीने (Vaishnavi Hagawane) फाशी घेतली आहे. वैष्णवीला चेलाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या दोन्ही हातांवर, मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर आणि गळ्याजवळ तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता जखमेच्या खुणा होत्या. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानुसार कलमे वाढवली जाणार आहेत.

News Title – vaishnavi hagawane also attempt sucide before

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now