वैभव सूर्यवंशीसोबत मैदानात धक्कादायक प्रकार! व्हिडिओ व्हायरल होताच क्रिकेट विश्वात खळबळ

On: June 16, 2026 1:10 PM
Vaibhav Sooryavanshi (1) (1)
---Advertisement---

Vaibhav Sooryavanshi | अवघ्या 15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरलेला भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या श्रीलंका (Sri Lanka) दौऱ्यावर आहे. मात्र, मैदानावरील त्याच्या कामगिरीपेक्षा सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये वैभव श्रीलंकेच्या खेळाडूला धक्का देताना दिसत असून या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

व्हायरल व्हिडिओमागील नेमकं कारण काय? :

इंडियन प्रीमियर लीग 2026 (Indian Premier League 2026 – IPL 2026) स्पर्धेत दमदार कामगिरी करत वैभव सूर्यवंशीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्पर्धेत ऑरेंज कॅप जिंकत त्याने जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यानंतर त्याची भारतीय ट्वेन्टी-20 (Indian T20 Team) संघात निवड झाली आणि सध्या तो श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धचा सामना संपल्यानंतरचा 35 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये वैभव श्रीलंकेच्या एका खेळाडूकडे धावत जात त्याला धक्का देताना दिसत असल्याने अनेकांनी त्याच्यावर टीका केली. सुरुवातीला समोर आलेल्या या अर्धवट व्हिडिओमुळे संपूर्ण घटना न समजल्याने वैभवचीच चूक असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला.

Vaibhav Sooryavanshi | पूर्ण व्हिडिओनंतर बदलले चित्र :

यानंतर या घटनेचा 59 सेकंदांचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) पॅव्हेलियनकडे परतत असल्याचे दिसते. दोन्ही भारतीय खेळाडू शांतपणे जात असताना श्रीलंकेच्या एका खेळाडूने वैभवला उद्देशून चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, संबंधित श्रीलंकन खेळाडूने वैभवला थेट घरी परत जाण्यास सांगितले. या वक्तव्यानंतर वैभव संतापल्याचे दिसून येते आणि त्याने त्या खेळाडूला धक्का दिला. या प्रकरणानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अधिकृत स्तरावर अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. या घटनेवर संबंधित क्रिकेट मंडळ किंवा स्पर्धा आयोजकांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News title : Vaibhav Sooryavanshi Video Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now