⁠ऐकावं ते नवलच!, स्वतः वाघेरे करणार श्रीरंग आप्पा बारणेंना मतदान

On: May 4, 2024 10:55 PM
Shrirang Appa Barne
---Advertisement---

Pimpri Chinchwad | मावळ हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत या बालेकिल्ल्याची समीकरणेच बदलली आहेत. त्याला कारण आहे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे शिवसेनेच्या या गडावर थेट शिवसेनेचे दोन उमेदवार आमनेसामने असणार आहेत.

वाघेरे श्रीरंग बारणेंना मतदान करणार

शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट अशा चुरशीच्या लढतीमुळे हा मतदारसंघ यंदा चर्चेत आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Appa Barne) विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

बारणेंना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी सर्व नेते आणि कार्यकर्ते जीवाचं रान करताना दिसत आहेत. अशात वाघेरे आणि बारणे एकमेकांविरोधात मैदानात असताना श्रीरंग बारणे (Shrirang Appa Barne) यांचे सुपुत्र विश्वजीत बारणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. यामुळे मावळच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. वाघेर बारणेंना मतदान करणार असल्याचं वक्तव्य विश्वजीत बारणेंनी केलंय.

विश्वजीत बारणे म्हणाले की,” आमच्या ज्या मोठी काकी आहे, त्यांचे माहेरघर वाघेरे यांचे आहे. आणि आमचे पिंपरी गावातील अनेक नातेसंबंध आहेत. त्या अनुषंगाने 50 टक्के वाघेरे हे आमचे काम करत आहे. त्यामुळे नात्यागोत्याचे राजकारण पिंपरी शहराला नवीन नाही”

40 वर्षांपासून बारणे घराणे या शहराच्या विकासासाठी काम करतेय. ही निवडणूक ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेची नाही, हि निवडणूक देश कोणच्या ताब्यात देणार आहोत त्याची हि निवडणूक आहे. पिंपरी-चिंचवड  (Pimpri Chinchwad) शहरात नात्यागोत्याचे राजकारण असले तरी 50 टक्के वाघेरे घराणे आमचे काम करत असल्याचा दावा विश्वजीत बारणे यांनी केला आहे.

मावळात वाघेरे करणार बारणेंना मतदान!, विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी सांगितला किस्सा #trending #pcmc

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मला काहीही बोला पण…’; पॉर्न फिल्मवरुन चित्रा वाघ, अंधारेंमध्ये जुंपली

प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

गोविंदाची भाची रागिणी खन्नाचा धक्कादायक खुलासा!

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने राजकारण पेटलं; भाजप-ठाकरे गटात राडा

“अजितदादांना खायचं कसं हे माहितीये म्हणूनच…”; खासदाराचं मोठं वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now