Uttar Pradesh | चायनिज हा प्रकार अनेकांना आवडत असतो. त्यात विविध खाद्यपदार्थांचं मिश्रण असतं. मात्र त्याच मिश्रणामुळे चायनिज खाताना जीभेला चविचा चटका लागतो. मात्र हे खात असाल तर तुम्ही हे खाणं बंद केलं पाहिजे. कारण काही दिवसांआधी मुंबईत शोरमा खाणं एका मुलाला महागात पडलं आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) घडली आहे. नुडल्स खाणं हे जीवावर बेतलं आहे. (Uttar Pradesh)
नेमकं काय घडलं?
उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) पिलीभीत राहुल येथे एका कुटुंबियांनी राईस आणि नुडल्स गुरूवारी (9 एप्रिल) रोजी खाल्ल. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी उलट्या, जुलाब होऊ लागल्या. चांदिया हजारा गावातील रूग्णालयात रूग्णांना दाखल करण्यात आलं. दिवसभर उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. मात्र घरी सोडल्यानंतरही पुन्हा एकदा त्रास सुरू झाला. (Uttar Pradesh)
शुक्रवारी उलट्या आणि जुलाब झाल्याचे कुटुंबातील सदस्याने सांगितलं. त्यामुळे अनेकांना विषबाधा झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यामध्ये सुरूवातीला कुटुंबातील एकाचा विषबाधेने मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (Uttar Pradesh)
उपचार सुरू असताना शनिवारी इतर 5 जणांना सीएचसीमध्ये नेण्यात आलं होतं. तिथं प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचं सांगितलं. ही विषबाधा कशी होते याबाबत समजून घेऊया.
विषबाधा होण्याचं कारण?
अन्नातही अशुद्धता असते. अनेकदा अन्नातील अशुद्धता ही जेवनात मिसळली गेल्याने विषबाधा होते. दोन वेगवेगळ्या गुणधर्माचे पदार्थांचे सेवन केल्याने विषबाधा होते. अनेकदा बराच वेळ ठेवलेल्या अन्नामध्ये देखील विष पसरलं जातं. त्यामुळे विषबाधा होण्याची समस्या निर्माण होते.
विषबाधा होण्याची अनेक लक्षणं असू शकतात. मग ते डोके दुखणे, चक्कर येणे, उलट्या येणे, ताप येणे, जुलाब, थकवा, कधी कधी रूग्णाला अस्पष्ट दिसू लागणे विषबाधा झाल्याची अशी मुख्य लक्षणे असल्याचं समजतं.
News Title – Uttar Pradesh In Noodles In Food Poisoning
महत्त्वाच्या बातम्या
नवव्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तोंड उघडलं, सगळं खरं खरं सांगून टाकलं
बीडमध्ये कोण निवडून येणार?; मनोज जरांगेंचं भाकीत
क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत
“फडणवीस राजकारणातील कच्च मडकं, त्यांना..”; संजय राऊतांची खोचक टीका
वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल!






