Operation Sindoor | भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर, अमेरिकेने (America) पाकिस्तानला (Pakistan) प्रतिहल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. व्हाइट हाउसच्या (White House) अधिकृत सूत्रांनी दावा केला आहे की, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (US NSA) आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो (Marco Rubio) यांनी पाकिस्तानला ही ताकीद दिली आहे.
अमेरिकेकडून पाकिस्तानला सक्त ताकीद-
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला बजावले की, भारताच्या कारवाईविरोधात कोणतीही कृती करण्याचा विचार करू नये आणि भारताशी युद्ध पुकारण्याचे धाडस करू नये. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा भारताला अधिकार होता, असेही रुबियो यांनी म्हटले आहे. आता पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कोणताही हल्ला न करण्याची योजना आखावी, असे ते म्हणाले. मार्को रुबियो यांनी पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी (Pakistani NSA) चर्चा करून त्यांना शांत राहण्यास सांगितले. भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा विचारही करू नका, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला.
हल्ल्यानंतर मार्को रुबियो यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल एक्सवर (X) पोस्ट केले की, “मी भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आज पूर्वी केलेल्या टिप्पणीनुसार, मला आशा आहे की हे लवकरच संपेल आणि शांततापूर्ण निराकरणासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वासोबत संवाद सुरू ठेवू.”
भारताची कारवाई आणि अमेरिकेची भूमिका
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी एका निशस्त्र पर्यटकाची हत्या केली होती, तसेच अनेक महिलांचा मृत्यू झाला होता आणि एकूण २६ लोक मारले गेले होते. यानंतर, भारताने ७ मे रोजी रात्री उशिरा पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या हल्ल्यात भारताने ९ पाकिस्तानी दहशतवाद्यांना लक्ष्य करून ठार केले. या हवाई हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.
या हल्ल्यांनंतर लगेचच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (Ajit Doval) यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव (US Secretary of State) यांच्याशी चर्चा करून त्यांना ऑपरेशन दरम्यान केलेल्या कारवाईची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही परिस्थितीवर भाष्य करताना तणाव लवकर निवळण्याची आशा व्यक्त केली. ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान बऱ्याच काळापासून लढत आहेत, मला आशा आहे की हे लवकरच संपेल.”
Title : US Warns Pakistan Post India’s ‘Operation Sindoor’






