अभिनेत्री उर्मिला कोठारेची कोर्टात धाव, ‘त्या’ व्यक्तीच्या मृत्यूला कोण जबाबदार?

On: February 16, 2025 2:43 PM
Urmila Kothare Moves Court After Car Accident, Files Plea
---Advertisement---

Urmila Kothare | प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारेच्या कारचा डिसेंबरमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर, तिने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. या अपघाताचा तपास योग्य प्रकारे व्हावा यासाठी तिने याचिका दाखल केली आहे. तिने काही धक्कादायक आरोप सुद्धा केले आहेत, त्यामुळे या अपघात प्रकरणाला धक्कादायक वळण लागल्याचं मानलं जात आहे. (Urmila Kothare)

उच्च न्यायालयात याचिका

28 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या अपघातात उर्मिलाच्या चालकाने भरधाव गाडी चालवत मेट्रोचे (Metro) काम करणाऱ्या दोन मजुरांना धडक दिली होती, ज्यात एकाचा मृत्यू झाला. उर्मिला, तिचा चालक आणि एक कामगार गंभीर जखमी झाले होते. गाडीचाही चुराडा झाला होता. या घटनेला दीड महिना उलटल्यानंतर तिने हि याचिका दाखल केली आहे.

या अपघाताचा तपास सीआयडी (CID) किंवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी तिने याचिकेत केली आहे. फौजदारी याचिकेद्वारे तिने मुंबई उच्च न्यायालयात ही मागणी केली आहे. तसेच, मुंबई पोलीस (Mumbai Police) सीसीटीव्ही (CCTV) फुटेज देत नसल्याची तक्रारही तिने केली आहे. उर्मिलाच्या वतीने, अपघातस्थळाचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची विनंती पोलिसांकडे करण्यात आली होती, परंतु तिथे सीसीटीव्ही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Urmila Kothare)

याचिकेत गंभीर आरोप

याचिकेत, मुंबई पोलीस एका खासगी कंपनीला पाठिंबा देत असल्याचा आरोप कोठारे यांनी केला आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्ता खोदलेला होता आणि तिथे कोणतेही योग्य दिशादर्शक फलक लावलेले नव्हते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारही जबाबदार असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. (Urmila Kothare)

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने या अपघाताचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. समता नगर पोलीस ठाण्याला (Samta Nagar Police Station) दोन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 28 डिसेंबर 2024 रोजी कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ (Poisar Metro Station) हा अपघात झाला होता.

Title : Urmila Kothare Moves Court After Car Accident, Files Plea

 

Join WhatsApp Group

Join Now