UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! एक चूक आणि पैसे गेले? हा आहे पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग

On: March 19, 2026 3:21 PM
UPI Wrong Payment
---Advertisement---

UPI Wrong Payment | आजच्या डिजिटल युगात Unified Payments Interface (UPI) मुळे व्यवहार अतिशय सोपे झाले आहेत. मात्र, घाईगडबडीत अनेकदा चुकीच्या नंबरवर पैसे पाठवण्याची चूक होते. एकदा UPI पिन टाकल्यानंतर व्यवहार त्वरित पूर्ण होतो आणि तो रद्द करता येत नाही. त्यामुळे अशा वेळी घाबरुन जायचं कारण नाही, योग्य पावले उचलणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

जर तुमच्याकडून चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर झाले असतील, तर सर्वप्रथम त्या व्यक्तीशी संपर्क साधून पैसे परत करण्याची विनंती करा. अनेकदा समोरची व्यक्ती प्रामाणिकपणे पैसे परत करते. मात्र, जर प्रतिसाद मिळाला नाही, तर त्वरित National Payments Corporation of India (NPCI) कडे तक्रार नोंदवा.

NPCI ने यासाठी टोल-फ्री हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही 1800-120-1740 या नंबरवर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, तुमच्या संबंधित बँकेत जाऊन लेखी तक्रार देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. जर बँकेकडून वेळेत प्रतिसाद मिळाला नाही, तर तुम्ही Reserve Bank of India (RBI) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बँकेविरुद्ध तक्रार करू शकता. RBIच्या नियमांनुसार, अशा प्रकरणात बँकेने 48 तासांच्या आत तक्रारीवर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे.

महत्त्वाचे म्हणजे, व्यवहार केल्यानंतर मिळणारा ट्रान्झॅक्शन आयडी (UTR/Reference Number) सुरक्षित ठेवा. तक्रार करताना हा क्रमांक अत्यावश्यक असतो. डिजिटल व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हाच सर्वोत्तम उपाय आहे पण चूक झालीच, तरी योग्य पद्धतीने कारवाई केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते.

आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, जर ऑनलाइन व्यवहार चुकून झाला असेल, तर बँकांनी 48 तासांच्या आत तक्रारीची दखल घेऊन परतावा प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक आहे. जर तुमची बँक सहकार्य करत नसेल किंवा प्रक्रियेला विलंब लावत असेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://rbi.org.in/Home.aspx) बँकेविरुद्ध दाद मागू शकता.

Join WhatsApp Group

Join Now