UPI वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून लागू होणार नवे नियम

On: May 1, 2025 6:03 PM
UPI Credit Line
---Advertisement---

UPI New Rules 2025 | UPI वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. आता युपीआय व्यवहार अधिक जलद आणि खात्रीशीर होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नवीन नियम लागू करत 16 जून 2025 पासून युपीआय ट्रांझॅक्शनचा रिस्पॉन्स टाईम मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. (UPI New Rules 2025)

16 जूनपासून नवे बदल 

NPCI ने 26 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या सर्क्युलरनुसार, युपीआय व्यवहारांमध्ये झपाट्याने प्रतिसाद मिळावा यासाठी नव्या प्रोसेसिंग मानकांची अंमलबजावणी केली जात आहे. यापुढे Request Pay आणि Response Pay सेवा केवळ 15 सेकंदात होतील, याआधी या सेवेसाठी 30 सेकंदांचा वेळ दिला जात होता.

त्याचप्रमाणे, Check Transaction Status आणि Transaction Reversal या सेवांसाठी आता 10 सेकंदांची कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. Validate Address साठी देखील 10 सेकंदांचा रिस्पॉन्स टाईम ठेवण्यात आला आहे. या सुधारणेमुळे व्यवहारातील विलंब टळून, वापरकर्त्यांचा अनुभव अधिक जलद  होईल.

तांत्रिक बिघाडानंतर महत्त्वाचे पाऊल

NPCI च्या या निर्णयामागे एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. मार्च व एप्रिल महिन्यांत युपीआय व्यवहारांमध्ये अनेक वेळा यंत्रणात्मक बिघाड निर्माण झाला होता. 26 मार्च, 1 एप्रिल आणि 12 एप्रिल 2025 रोजी हजारो व्यवहार अयशस्वी झाले होते, यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विशेषतः 12 एप्रिल रोजी युपीआय प्रणाली पूर्णतः कोलमडली होती.

ही समस्या लक्षात घेऊनच NPCI ने सर्व बँका आणि पेमेंट अ‍ॅप्स (जसे की GPay, PhonePe इ.) यांना सुधारित वेळमर्यादा पाळण्याचे निर्देश दिले आहेत. तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी योग्य यंत्रणा तयार ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे.

सध्या युपीआयद्वारे दरमहा सुमारे ₹25 लाख कोटींचे डिजिटल व्यवहार होतात. वाढत्या वापरकर्त्यांमुळे  युपीआय सेवा अधिक मजबूत करण्याची गरज होती. नव्या बदलामुळे ही सेवा केवळ वेगवानच नव्हे तर अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहे.

 Title: UPI New Rules 2025 from June 16

 

Join WhatsApp Group

Join Now