Unseasonal Rain | अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) नको नको करून ठेवलं आहे. मुंबईची तुंबई व्हायला फार वेळ लागत नाही. एका पावसात मुंबईची तुंबई होते. हे प्रत्येक पावसाने दाखवून दिलं आहे. एवढंच नाहीतर पावसासह वादळी वाऱ्यासह मोठा फटका बसला आहे. मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपर आणि वडाळ्यामध्ये दोन अपघात घडले आहेत. दोन्ही अपघाताचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ आता समोर आले आहेत.
काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर
वडाळ्यात श्रीजी टॉवरच्या शेजारी कार पार्कींगसाठी बनवण्यात येत असलेल्या ठिकाणी अपघात झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बांधकाम करण्यासाठी लावण्यात आलेला जिना पडला आहे. या दुर्घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. (Unseasonal Rain)
मुंबईला वादळाचा तडाखा; पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला जिना, अंगावर काटा आणणारा Video#MumbaiRain pic.twitter.com/GWsnPUgqxJ
— News18Lokmat (@News18lokmat) May 13, 2024
तसेच घाटकोपर येथे मोठी होर्डिंग पडली आहे. त्याखाली अनेकजण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या गाड्यांचेही नुकसान झालं असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मुंबईत धुळीच्या वादळाचं तांडव, 5 सेकंदात होर्डिंग कोसळलं, काही जण अडकले#MumbaiRain pic.twitter.com/gH3gcSRGJp
— News18Lokmat (@News18lokmat) May 13, 2024
आज दुपारनंतर मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर आणि आसपासच्या भागामध्ये वादळी वारा आणि पावसाला सुरूवात झाली. बदलापूरमध्येही गारा पडल्या आहेत. याचा परिणाम हा मध्य रेल्वेवर झाला आहे.
अंबरनाथ येथे झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. मध्य रेल्वे विस्कळीत झाले आहेत. याचा विपरित परिणाम हा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवर होताना दिसत आहे. आज मुंबईसह राज्यात पावसाने थौमान घातलं आहे.
अवकाळी पावसाचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता
काही ग्रामीण भागातही पावसाचे प्रमाण (Unseasonal Rain) वाढलं आहे. देशासह राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान होतं. मात्र काही मतदारसंघात पावसाचे सावट होते. काही ठिकाणी मतदानाची वेळ संपण्याआधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा काहीशा प्रमाणात मतदानाचा टक्का घसरण्याची चिन्हे आहेत. (Unseasonal Rain)
News Title – Unseasonal Rain In Came In Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
“मला मतदान करु दिले नाही, कारण…”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल
“असा पंतप्रधान मी पहिल्यांदा पाहिला जो फक्त…”
मतदान संपण्याआधीच अवकाळी पावसाचा धुमाकूळ, मतदानाच्या टक्केवारीत घसरण होण्याची शक्यता
प्रतिक्षा संपली! दयाबेन ‘तारक मेहता..’ मालिकेत पुन्हा परतणार?, मोठी अपडेट समोर
“मुंडे साहेबांना अग्नी दिला त्याचदिवशी..”; पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा






