रश्मी ठाकरेंबाबत बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले…

On: May 22, 2024 1:10 PM
Umesh Patil big revelation about 2019 Shiv Sena-NCP alliance 
---Advertisement---

Umesh Patil | 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी व कॉँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र, आता नवीनच खुलासा झालाय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केलेल्या खुलाश्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत मोठा गौप्यस्फोट केलाय.राऊत खोटं बोलत आहेत.एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता, असं म्हणत त्यांनी खुलासा केला.

“आदित्य ठाकरेंच्या नावाला शरद पवारांनी नकार दिला”

“2019 मध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे ठरले. पण, रश्मी ठाकरेंची हट्टापायी आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे शक्य नसल्याने संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता.”, असा खुलासा उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केलाय.

तसंच पुढे बोलताना ते म्हणाले की, “आदित्य ठाकरेंच्या नावाला शरद पवारांनी नकार दिला.त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेनाकडे आणि अडीच वर्षे प्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळेच भाजपसोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.”, असं उमेश पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

“..म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही”

पुढे उमेश पाटील यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतही भाष्य केलं.शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं लागलं कारण सर्व आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती.असं उमेश पाटील यावेळी म्हणाले.

” भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद द्यायचं असेल तर त्यासाठी दुसरं नेतृत्व पक्षात नको म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही.”, असंही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी म्हटलंय. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

News Title – Umesh Patil big revelation about 2019 Shiv Sena-NCP alliance 

महत्त्वाच्या बातम्या-

एलिमिनेटर सामन्यात RCB चं पारडं जड राहणार; तर राजस्थानचा संघ पुन्हा ती चूक करणार?

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ

पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय

‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा

Join WhatsApp Group

Join Now