“दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचं..”; उद्धव ठाकरे कडाडले

On: May 12, 2024 11:44 AM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघात केला. खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे भरपूर प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू, अशा शब्दात ठाकरे यांनी इशारा दिला.

“मोदी एखाद्या गल्लीबोळातही रोड-शो करतील”

‘आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला बहुतेक सभांतूनही असं जाणवतंय की, आम्ही तर बोलत असतोच, पण लोकांनाही आता सगळं कळलेलं आहे. एखाद्या मुद्याला सुरुवात केली की, लोकच समोरून एकेक विषय बोलत असतात. म्हणजे जागृती हा विषय झालेला आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी मोदींच्या दौऱ्याबाबतही टीका केली. “निवडणुकीत मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, ते एखाद्या गल्लीबोळातही रोड-शो करतील.त्या दोघांनी असा दौरा करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं.

चौथ्या टप्प्यातील मतदान ‘या’ ठिकाणी होणार

नरेंद्र मोदी यांनी तीन टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्र दौरे केले. यावेळी त्यांनी प्रत्येक सभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या सर्व टीकेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुलाखतीमध्ये सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

देशात तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता उद्या 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, अहमदनगर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे आणि शिरुर येथे मतदान पार पडणार आहे.

News Title : Uddhav Thackeray targets Narendra Modi and Amit Shah

महत्वाच्या बातम्या- 

कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल

आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

कार घेयचा विचार करताय? तर या आहेत टॉप-5 हॅचबॅक कार

शेतकऱ्यांची चिंता वाढली; अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार

मदर्स डे स्पेशल पाहा हे थ्रिलर चित्रपट; अंगावर येईल काटा

Join WhatsApp Group

Join Now