“ठाकरेंनी मराठी माणसाचा घात केलाय”; भाजपच्या ‘या’ खासदाराची घणाघाती टीका

On: June 30, 2025 10:57 AM
Hindi GR
---Advertisement---

Hindi GR | राज्य सरकारने हिंदी विषयाशी संबंधित जीआर रद्द केल्याबद्दल बोंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. मात्र नागपूरमध्ये बोलताना भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आता फडणवीसांचा सत्कार करावा, असा उपरोधिक सल्ला दिला आहे.

“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना त्रिभाषा सूत्र लागू करून मराठी विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतला होता,” असा आरोप बोंडे यांनी केला. “आता मात्र फडणवीस सरकारने तो निर्णय मागे घेत मराठी जनतेला न्याय दिला आहे,” असं ते म्हणाले.

“चित्रपट काढायलाही हरकत नाही” – बोंडे यांचा टोला :

“आपलं पाप झाकण्यासाठी जर कोणी खटाटोप करत असेल, तर त्यावर चित्रपट काढायला काय हरकत आहे?” असा सवाल करत बोंडे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, पक्ष वाचवण्यासाठी आता “विजय सभा” घ्यावीच लागेल, हेच त्यांचं अस्तित्व टिकवण्याचं साधन बनलं आहे. (Hindi GR cancelled Maharashtra)

बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात हिंदी भाषा, मराठी अस्मिता आणि शिक्षण धोरणांवरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Hindi GR | हिंदी जीआर रद्द; आता नरेंद्र जाधव समिती ठरवणार त्रिभाषा धोरण :

राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचं शिक्षण राबवण्याचा निर्णय आता मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी स्पष्ट केलं की, यासंदर्भातील दोन्ही जीआर रद्द करण्यात आले आहेत. तसेच या निर्णयावर पुढील अभ्यासासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

ही समिती माशेलकर समितीचा अहवाल अभ्यास करून त्रिभाषा सूत्र राज्यात लागू करायचं की नाही, यावर शिफारस करेल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

News Title: Uddhav Thackeray Should Felicitate Fadnavis for Cancelling Hindi GR: BJP MP Anil Bonde Targets Shiv Sena

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now