Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेवर टीका करताना ‘उबाठा’ नाव घेत टीका करत असतात. मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना असं निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं नाव दिलं. मात्र एकनाथ शिंदे उबाठा असा उल्लेख करत असल्याने आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं उद्धव ठाकरेंनी घातलं बारसं?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचं एकनाथ शिंदे उबाठा असं नाव घेतात. तर आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एसंशि असं संक्षिप्त स्वरूपाचं जशास तसं नाव देत एकनाथ शिंदे यांना तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली होती. मुलाखतीच्या पहिल्या भागात त्यांनी अमित शहा, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यामध्ये एसंशि असं संक्षिप्त नाव देण्यात आलं.
उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे. त्यांना ते नाव घ्यायला लाज वाटते. त्यांच्या फुलफॉर्म नावावरून विचारलं असता, उद्धव ठाकरे म्हणाले त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते मग मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
तुम्ही आईशी गद्दारी केली
एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. याचा महाराष्ट्रातील जनतेला राग आहे. तुम्ही राजकारणातल्या आईशी गद्दारी केली. तुम्ही शिवसेनेशी गद्दीर केली. तुम्हाला राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना आईच्या कुशीवर वार केला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मोदींनी उद्योगधंदे गुजरातला पळवले. हे फक्त ते पाहत बसले होते. मराठी माणूस कधी कोणत्याही राज्यात जाऊन दमदाटी करत नाही पण मग आता महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते कोणाच्या आशीर्वादाने चाललंय?, असा सवाल आता उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी रोडशो देखील करत आहेत, त्यांना मराठी लोकं काय दाखवायचं आहे ते दाखवून देतील. भले ते गुजराती असतील, मुस्लिम असतील, उत्तर भारतीय असतील आपण कोरोना काळात जे काम केलं आहे ते याबाबत कधीच विसरले नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
News Title – Uddhav Thackeray Replied To Eknath Shinde About UBT Shivsena Statement
महत्त्वाच्या बातम्या
कॉउंटडाउन सुरु! दहावी, बारावीचा निकाल कोणत्याही क्षणी होणार जाहीर; या वेबसाईटवर पाहा निकाल
आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
कार घेयचा विचार करताय? तर या आहेत टॉप-5 हॅचबॅक कार






