कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट; श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरेंची राजकीय खेळी?

On: May 3, 2024 6:09 PM
Uddhav Thackeray group filed yet another nomination for Kalyan Lok Sabha
---Advertisement---

Uddhav Thackeray | कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. गेल्या 10 वर्षांपासून येथे श्रीकांत शिंदे खासदार आहेत.यंदा होणाऱ्या निवडणुकीत त्यांना या जागेचं तिकीट मिळणार की नाही?, याबाबत साशंकता होती. विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव असूनही त्यांची उमेदवारी धोक्यात असल्याची बरीच टीका करण्यात आली.

अखेर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणच्या जागेबाबतचा तिढा सोडवला. त्यांनी कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे उमेदवार असतील, असं जाहीर केलं होतं. त्यामुळे महायुतीकडून श्रीकांत शिंदे हे आता अधिकृत उमेदवार आहेत. तर, ठाकरे गटाकडून येथे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल

दरेकर यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. मात्र, अशात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वेगळीच राजकीय चाल खेळण्याच्या विचारात असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

त्यामुळे निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात. ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गट 6 तारखेला एबी फॉर्म बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राजकीय चाल?

यामुळे कल्याण लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. उमेदवार जाहीर झाला असताना अजून एक अर्ज भरल्याने नेमकं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मनात चाललंय तरी काय?, याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

कल्याणमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जरा तणावाचेच संबंध आहेत. मागेच भाजपच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या शहराध्यक्षावर पोलीस ठाण्यात गोळीबार करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी यावेळची निवडणूक जरा कठीणच जाणार, असं म्हटलं जातंय.

News Title –  Uddhav Thackeray group filed yet another nomination for Kalyan Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या –

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ

“कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?”; रोहित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे

Join WhatsApp Group

Join Now