उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

On: May 13, 2025 9:56 AM
Tejaswi Ghosalkar Resignation
---Advertisement---

Tejaswi Ghosalkar Resignation | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मुंबईतून मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीतील आघाडीच्या नेत्या, माजी नगरसेविका आणि दिवंगत अभिषेक घोसाळकर (Abhishekh Ghosalkar) यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, घोसाळकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यात जवळचे कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे हा राजीनामा अधिक चर्चेचा ठरत आहे. (Tejaswi Ghosalkar Resignation)

सूत्रांच्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विभागप्रमुखांना राजीनामा पाठवला आहे. या निर्णयामागे स्थानिक नेतृत्वावरील नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते त्यांच्या मन वळवण्याचा प्रयत्न करत असून, ही नाट्यमय घडामोड पक्षासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

अभिषेक घोसाळकर हत्येनंतर मोठा राजकीय वळण :

तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नरोन्हा या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्या घटनेनंतर घोसाळकर कुटुंबाला धक्क्यातून सावरण्याची वेळ आली होती. आता तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा ही घटनांची पुढची कडी मानली जात आहे.

राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांचा पुढचा राजकीय प्रवास शिंदे गटात की भाजपमध्ये होणार याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार आहे.

Tejaswi Ghosalkar Resignation | धमक्यांनी वाढली चिंता :

गेल्या महिन्यात तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar Resignation) यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आली होती. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना’ असा मजकूर असलेल्या मेसेजमुळे त्यांचा मानसिक तणाव अधिक वाढल्याचं बोललं जात आहे.

राजीनामा देताना तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या,
“मी तेजस्वी घोसाळकर, महिला – दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुखांचे मन:पूर्वक आभार मानते. माझा हा राजीनामा स्वीकारावा ही नम्र विनंती.” (Tejaswi Ghosalkar Resignation)

News Title: Uddhav Thackeray Gets a Shock in Mumbai as Tejaswi Ghosalkar Resigns from Shiv Sena UBT

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now