‘तू येच तुला आडवा करतो’; अरे शुभ बोल नाऱ्या…उद्धव ठाकरे भडकले

On: May 4, 2024 2:01 PM
Dasara Melava 2025
---Advertisement---

Uddhav Thackeray l देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच लोकसभेचं दोन टप्प्यातील मतदान देखील पार पडलं आहे. आता 7 मे ला महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळींचे प्रचारार्थ महाराष्ट्र दौरे सुरु आहेत. या प्रचारसभेदरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसत आहे.

कोकणात ये पाहतो- नारायण राणे

अशातच शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कोकणात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. त्यावेळी नारायण राणेंनी कोकणात ये पाहतो, तू येच तुला आडवा करतो अशा धमक्या उद्धव ठाकरेंना दिल्या होत्या.

विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी काल कणकवलीत प्रचार सभा घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी मला धमकी दिली. मात्र मराठीत एक म्हण आहे ‘शुभ बोल रे नाऱ्या’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray l ‘शुभ बोल रे नाऱ्या’ उद्धव ठाकरेंचा नाव न घेता टोला :

उद्धव ठाकरे यांनी कणकवलीत प्रचारसभेत नारायण राणेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रत्यारोपला नारायण राणे व राणे समर्थकांकडून काय प्रतिउत्तर येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी चालली आहे. यावेळी नारायण राणे आणि विनायक राऊत या दोन्ही दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. मात्र यावेळी कोण आघाडी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title – Uddhav Thackeray Attack On Narayan Rane

महत्त्वाच्या बातम्या –

TMKOC मधील सोढीबाबत मोठी अपडेट समोर!

बारणेंना निवडणून आणण्यासाठी भाजप करतंय जिवाचं रान, ‘हा’ आहे खास प्लॅन

उर्फीला शिव्या घालणाऱ्यांनीही केलं तिचं कौतुक, उर्फीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपचा दरवाजा ठोकून थकला, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; या बड्या नेत्याची पवारांकडे मागणी

पैसे टिकत नाहीयेत?, चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की करा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now