“राहुल सोलापूरकरला गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, जिथे दिसेल तिथे ठेचा आणि गाडा”, उदयनराजे संतापले

On: February 5, 2025 4:24 PM
Udayanraje Bhosale Angry Over Rahul Solapurkars Controversial Statement on Chhatrapati Shivaji Maharaj
---Advertisement---

Udayanraje Bhosale | अभिनेता राहुल सोलापूरकरने (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. सोलापूरकरने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा तीव्र निषेध करत छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी राहुल सोलापूरकरला जाहीर धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. “राहुल सोलापूरकर जिथे दिसेल तिथे त्याला ठेचा आणि त्याला गाडा,” असा संतप्त आदेशच त्यांनी शिवप्रेमींना दिला आहे.

“त्यांना वेचून ठेचलं पाहिजे”:

“केवळ मलाच नाही तर तमाम शिवभक्तांना या विधानामुळे वेदना होत आहेत. हा राहुल सोलापूरकर कोण आहे? तो म्हणाला लाच! जे लाच घेतात त्यांना लाचखोरीशिवाय काही समजत नाही. असं बोलताना जिभेला हाड नसतं हे माहीत आहे. पण लावली जीभ टाळ्याला आणि काहीही बडबडायचं? अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधाने करणाऱ्यांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे. वेचून ठेचलं पाहिजे,” असा संतप्त उद्रेक उदयनराजेंनी केला. “ही विकृती जर अशीच वाढत राहिली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जातीधर्मात अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

अमित शहांची भेट घेणार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी:

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)  यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून त्यासाठी ते लवकरच गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. “मी लवकरच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शहा यांची भेट घेणार आहे. अशी विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना वेळीच थांबवलं पाहिजे. त्यांचे सिनेमे बंद केले पाहिजेत. निर्माते, दिग्दर्शकांनीही अशा लोकांना थारा देऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले.

“त्याला आणि अशा सगळ्यांनाच गोळ्या घातल्या पाहिजेत”:

“या लोकांना गाडलं पाहिजे. त्यांना गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. मी अत्यंत कठोर शब्दांत याचा निषेध करतो. मला विचाराल तर त्याला गोळ्या घालूनच मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील त्या सर्वांना गोळ्या घातल्या पाहिजेत. कुणीही उठायचं आणि बेताल विधानं करायची? जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराज पुढे गेले. अशा महापुरुषांबद्दल अशी विधाने होत असतील तर दुसरा काही पर्याय नाही. तो जिथे दिसेल तिथे त्याला ठेचा आणि गाडा,” असा तीव्र संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

सोलापूरकरला तुरुंगात टाकण्याची मागणी:

“असे लोक इतिहासाला वेगळं वळण देतील. कालांतराने शिवाजी महाराजांना वेगळं दाखवतील. आज आपण शिवाजी महाराजांची प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवतो. कारण, बाकीच्यांनी साम्राज्य वाढवण्यासाठी लढाया केल्या, पण शिवाजी महाराज गोरगरिबांसाठी लढले. स्त्रियांचं संरक्षण केलं. परकीय आक्रमण थोपवलं. त्यांच्यावर कारवाई करा. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्यांना तुरुंगात टाका. मी एक-दोन दिवसांत अमित शहा यांची भेट घेणार आहे. आधीही त्यांना भेटलो होतो. खासदार असो की मंत्री असो, अशा लोकांना शोधून गाडलं पाहिजे. ठेचलं पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे. औरंगजेबाच्या भेटीला जाताना लाच दिली म्हणून भेटीला गेले? तसे नव्हते. ते त्यांच्या शौर्याचे प्रतीक होते. लाच कशाला देतील? त्या राहुल सोलापूरकरची लायकी काय आहे? त्याने तसे विधान केले तर त्याला औरंगजेबाची औलादच म्हणायला पाहिजे. त्याच्यावर किती चर्चा करायची? त्याला ठेचा ना. किती वेळ लागतोय?” असा संतप्त सवालही उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) उपस्थित केला.

Title : Udayanraje Bhosale Angry Over Rahul Solapurkars Controversial Statement on Chhatrapati Shivaji Maharaj

 

Join WhatsApp Group

Join Now