तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! आता ‘या’ पदार्थांवर होणार धडक कारवाई!

On: August 8, 2026 7:24 PM
Tukaram Mundhe
---Advertisement---

Tukaram Mundhe | अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. दूध, पनीर तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न देणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई केल्यानंतर आता चायनीज फूड (Chinese Food) त्यांच्या पुढील लक्ष्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कॉलेजच्या दिवसांतील खाद्यपदार्थांच्या आठवणीही सांगितल्या.

चायनीज फूडवर पुढील कारवाईचे संकेत :

‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या कार्यक्रमात ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखतीत मुंढे बोलत होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर त्यांनी खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि निकृष्ट दर्जाविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दूधातील भेसळ, बनावट किंवा भेसळयुक्त पनीर तसेच दर्जाहीन अन्न देणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई केल्यानंतर आता चायनीज खाद्यपदार्थांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंढे यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना पुणे विद्यापीठ परिसरात आणि पाषाण रोडवर चायनीज पदार्थांच्या गाड्या लागायच्या. त्यावेळी चायनीज फूड म्हणजे नेमके काय, याची आपल्याला माहिती नव्हती. कुतूहल म्हणून एका ठिकाणी जाऊन त्यांनी पहिल्यांदा चायनीज फूड खाल्ले. आज या पदार्थांना मोठी मागणी आहे. आपण यापूर्वी काही ठिकाणी कारवाई केली असून, आता चायनीज फूडच्या गुणवत्तेकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी लोकांकडून होत आहे. त्यामुळे पुढील काळात या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tukaram Mundhe | ऑम्लेट-पावपासून फरसाणापर्यंतच्या आठवणी :

मुलाखतीदरम्यान तुकाराम मुंढे यांनी आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांबाबतही काही जुन्या आठवणी सांगितल्या. कॉलेजमध्ये असताना नियमित जेवणाची सोय होत नव्हती आणि मेसमध्येही जाता येत नव्हते. त्यामुळे परिस्थितीनुसार रस्त्यावरील खाद्यपदार्थ खावे लागत होते. संभाजीनगरमध्ये अप्सरा आणि आंबा टॉकीजच्या समोर ऑम्लेट-पावच्या गाड्या लागायच्या. सुरुवातीला ऑम्लेट म्हणजे काय, हेही त्यांना माहीत नव्हते. मात्र, पहिल्यांदा तेथे ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या भावाने गाडीवाल्याला सांगितले होते की, मुंढे तिथे आले की त्यांना ऑम्लेट द्यायचे आणि त्याचे पैसे आपण देऊ. या प्रसंगामुळे त्यांना ऑम्लेट खाण्याची सवय लागली.

कॉलेजच्या काळात फरसाण आणि केळी खाण्याचाही एक काळ होता, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी हा प्रकार लोकप्रिय होता आणि स्ट्रीट फूडही त्यांना आवडायचे. मात्र, आज त्याच प्रकारचे खाद्यपदार्थ खाल्ले तर आपली तब्येत इतकी बिघडेल की दोन तासांत बोलण्याचीही परिस्थिती राहणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. त्या काळात वापरले जाणारे तेल नेमके कसे असेल, असा प्रश्नही आता मनात येतो, असे ते म्हणाले. सध्या मात्र कोणतेही विशेष खाद्यपदार्थ आवडत नसल्याचे आणि मागील दोन महिन्यांपासून आपण काही खात नसल्याचेही तुकाराम मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.

News title : Tukaram Mundhe Targets Chinese Food

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now